Mumbai : विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रतेसंदर्भात निकाल देत आहेत. हा निकाल जर शिंदे गटाच्या बाजूने लागला तर उद्धव ठाकरेंसाठी मोठा झटका असणार आहे. विशेष म्हणजे ठाकरेंच्या 16 आमदारांपैकी 14 आमदार अपात्र ठरणार आहेत. ठाकरे गटात असूनही दोन आमदारांना विधानसभाध्यक्षांना अपात्र ठरवता येणार नाही.
शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्यासंदर्भात जी याचिका आहे. त्यामध्ये 16 आमदारांमधील आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके यांची नावे वगळ्यात आली आहेत. त्यामुळे जर ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरले तर या दोघांची नावे शिंदे गटाच्या याचिकेत नसल्याने त्यांना अपात्र ठरवता येणार नाही, अशी शक्यता आहे.
शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागला तर सुनील प्रभू, अजय चौधरी, सुनील राऊत, रवींद्र वायकर, राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख, भास्कर जाधव, राहुल पाटील, रमेश कोरगावकर, प्रकाश फातर्पेकर, उदयसिंह राजपूत, संजय पोतनीस, कैलास पाटील हे उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार आहेत.
आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार, याविषयी चर्चा सुरू असताना ठाण्यातील शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदेंसोबत कायम आहेत. शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागावा, म्हणून ठाण्यातील वागळे इस्टेट येथील गणपतीच्या मंदिरात महाआरती केली. शिवाय निकाल काही लागला तरी आम्ही शिंदेंच्या बाजूने काय राहू, अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.