Uddhav thackeray eknath shinde sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : मुंबईत ठाकरे की शिंदे, आवाज कुणाचा?

मृणालिनी नानिवडेकर : सरकारनामा

Special Analysis Of Shiv Sena Foundation Day : राज्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेना ( शिंदे गट ) आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाला मिळालेले यश आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा 58 वा वर्धापनदिन ( Shivsena Foundation Day 2024 ) बुधवारी साजरा केला जात आहे.

यानिमित्तानं दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी षण्मुखानंद सभागृहात, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळीच्या डोम येथे वर्धानपदिन साजरा करणार आहेत.

2022 मध्ये पक्षफुटीनंतर पहिला दसरा मेळाव्यात खोके घेत 'मातोश्री'ला दगा दिला, असा ठाकरे गटानं प्रचार केला होता. याला कुणी केली गद्दारी, असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं. पक्षफुटीनंतर शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेली आहे.

यात समसमान मते घेत दोन्ही शिवसेनेनं ( Shiv sena ) आपली बाजू बळकट ठेवली. लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूनं जनतेनं कौला दिला. त्यात ठाकरेंच्या शिवसेनेला नऊ जागांसह 16.52 टक्के मते मिळाली. तर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सात जागांसह 12.95 टक्के मते मिळाली आहेत. यात फक्त चार टक्क्यांचा फरक आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेनं 21 जागा तर शिंदेंच्या शिवसेनेनं 15 जागा लढविल्या होत्या. 13 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना झाला. त्यामध्ये 7 जागा ठाकरेंनी तर 6 जागा शिंदेंच्या शिवसेनेनं जिंकल्या. पण, अल्पसंख्याकांच्या मतांवर ठाकरे गट निवडून आला. तर, शिवसेनेचा मूळ हिंदुत्ववादी मतदार आपल्याकडे असल्याचा दावा शिंदे गटाचा आहे.

शिंदेंच्या सेनेनं ठाणे, कल्याण येथे आपलं वर्चस्व राखलं. कोकणात भाजपनं धक्का दिला. मात्र, मुंबईचा बालेकिल्ला ठाकरेंनी राखल्याचं त्या पक्षाकडून सांगितलं जातं. मुंबईत अमोल कीर्तिकर यांचा पराभव करत रवींद्र वायकर यांनी एक जागा जिंकली. 'ईव्हीएम'मध्ये गडबड करून ही जागा जिंकल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे.

'मुंबई खऱ्या शिवसेनेचीच' असं ठाकरे गटाचं मत आहे. पण, ठाकरे गटानं जिंकलेल्या जागा अल्पसंख्यांच्या मतांमुळे जिंकल्या आहेत, असा प्रचार शिंदे गटाकडून केला जात आहे.

अल्पसंख्याकांची मते ठाकरे गटाला

दक्षिण मुंबईतील मुंबादेवी, भायखळा येथील अल्पसंख्याक समुदायांची मते अरविंद सावंत यांना मिळाली. दक्षिण मध्य मुंबईत अणुशक्तीनगर, चेंबूर या भागातील अल्पसंख्याक मतदारांनी आणइ धारावीतल्या काँग्रेस मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी अनिल देसाई यांना निवडून आणलं. माहिम, वडाळा हा मराठीबहुल भाग राहुल शेवाळेंसोबत राहिल्याचा दावा केला जात आहे.

पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला पसंती देत मुंबईतल नगरसेवकांनी ठाकरे गट सोडला. पण, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत आम्ही जिंकू असा विश्वास ठाकरे गटाकडून केला जात आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT