Shivsena UBT Dasara Melava 2025 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर सुरु आहे. पाऊस सुरु असल्यानं मैदानावर पाणी साचून चिखल झाला असतानाही हजारो शिवसैनिक मैदानावर ठाण मांडून बसले आहेत. अनेकांनी आपल्या डोक्यावर खुर्च्या घेऊन ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी बसून होते. यावेळी ठाकरेंनी आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.
उद्धव ठाकरे म्हणाले, "आज दसरा मेळाव्यानिमित्त शिवाजी पार्कवर जो चिखल झाला ती कमळाबाईची कृपा आहे," अशा शब्दांत त्यांनी भाजपवर कडवी टीका केली. तसंच भाषणाची सुरुवात करताना त्यांनी महापुरात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचा विषय मांडला. त्यामुळं शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ मदत जाहीर करा अशी मागणी केली.
यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या दसरा मेळाव्यावर भाष्य केलं. संघाची १०० वर्षे ही नेमकी गांधी जयंतीच्या दिवशीच आली आहे, त्यामुळं हा कुठला योगायोग आहे? संघाच्या शंभर वर्षांच्या मेहनतीला आता विषारी फळं लागली आहेत. मोहन भागवत मुस्लीम नेत्यांसोबत बैठका घेतात आणि दुसरीकडं भाजपचे लोक हिंदू-मुस्लीम द्वेष पसरवत आहेत. भाजपला ना आकार ना उकार, ना ध्येय ना धोरण तो कसाही वाढतोय, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी संघावर आणि भाजपवर सडकून टीका केली.
क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करणारा बेशरम आहे, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही शरसंधान साधलं. भाजपची औलाद पगारी मतदार तयार करत आहे, असंही ठाकरेंनी मतचोरीच्या मुद्द्यावरुन भाजपला टार्गेट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.