Manoj Jarange Melava: मनोज जरांगेंनी शिवराळ भाषेच्या 'सीमा' ओलांडल्या! 40 मिनिटांच्या भाषणात व्यक्त केली खदखद

Manoj Jarange Melava: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा बीडच्या श्री क्षेत्र नारायणगड इथं पार पडला. मुंबईतल्या उपोषणानंतर पहिल्यांदाच जाहीर मेळावा होत असल्यानं जरांगे आपल्या दसरा मेळाव्यात काय बोलतात याची अनेकांना उत्सुकता होती.
Manoj Jarange
Manoj Jarange
Published on
Updated on

Manoj Jarange Melava: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा बीडच्या श्री क्षेत्र नारायणगड इथं पार पडला. मुंबईतल्या उपोषणानंतर पहिल्यांदाच जाहीर मेळावा होत असल्यानं जरांगे आपल्या दसरा मेळाव्यात काय बोलतात याची अनेकांना उत्सुकता होती. सध्या प्रकृती ठीक नसल्यानं उपचार सुरु असताना रुग्णवाहिकेतून येऊन त्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली. या मेळाव्यात सुमारे साताभराच्या भाषणात जरांगे यांनी मराठा आरक्षण, हैदराबाद गॅझेट, महापुरातमुळं शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, नुकसान भरपाईसाठी मदत अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. पण हे करत असताना त्यांनी आपल्या मनातली भडास मनसोक्तपणे बाहेर काढल्याचं जाणवलं.

यामध्ये अनेकांना त्यांनी शिव्यांची लाखोली देखील वाहिली. महाराष्ट्रात अधुनमधून अशाच खालच्या पातळीवरील भाषेसाठी ओळख निर्माण झालेले आमदार गोपिचंद पडळकर, नितेश राणे, खासदार संजय राऊत यांनी तर शिव्यांना जणूकाही प्रतिष्ठाचं मिळवून दिली आहे. पण जरांगेंनी आजच्या आपल्या भाषणात मोठ्या प्रमाणावर चिडचीड व्यक्त करताना शिवराळ भाषेच्या सीमाही ओलांडल्याचं दिसून आलं.

Manoj Jarange
Gopichand Padalkar News : ...म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांना बिरोबा बनातून पुन्हा एकदा झोडून काढलं; पडळकरांचा मोठा खुलासा

भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी नुकतेच आपले राजकीय प्रतिस्पर्धी जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवरील टीका केली होती. जयंत पाटील यांच्या वडिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी त्यांनी केली होती. त्यामुळं त्यांना अडचणीचा सामनाही करावा लागला होता. राष्ट्रवादी काँग्रेसनं पडळकरांच्या या विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी विशेष मेळावा घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. खुद्द शरद पवारांनी मुख्यंमत्र्यांना पत्र लिहून याप्रकरणी पडळकरांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही त्यांना समज दिली होती. पण यानंतर पुन्हा एकदा दोनच दिवसांपूर्वी पडळकरांनी जयंत पाटलांवर एकेरी भाषेत टीका करत पुन्हा एकदा राळ उडवून दिली होती.

Manoj Jarange
एलॉन मस्क यांनी मोडले श्रीमंतीचे सर्व रेकॉर्ड; जगातील एकमेव व्यक्ती...

अधेमध्ये भाजपचे आमदार सदाभाऊ खोत हे देखील अशाच प्रकारे शिवराळ भाषेचा वापर करत असतात. त्यामुळं त्यांच्यावरही मोठ्या प्रमाणावर टीका होत असते. तर दुसरीकडं कोकणातील भाजपचे आमदार नितेश राणे हे देखील प्रक्षोभक, चिथावणीखोर आणि शिव्यांसाठी ओळखले जातात. त्यांनाही मुख्यमंत्री फडणवीसांना अनेकदा समज द्यावी लागली आहे. पण तरीही ते पुन्हा पुन्हा ही चूक मुद्दामच करतात की काय अशी शंका उपस्थित होते. तसंच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचही यात नाव घेतलं जातं. पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत कायमच भाजपवर कडव्या शब्दांमध्ये टीका करत असतात. हे करत असताना एखाद्या घटनेवर भाष्य करताना किंवा शिवसेना अथवा उद्धव ठाकरेंवर टीका केलेल्या नेत्यांविरोधात बोलताना त्यांची जीभ घसरते.

Manoj Jarange
Manoj Jarange Patil News : 'गुलामीचं गॅझेट' म्हणणाऱ्यांना मरेपर्यंत हिसका दाखवा, सुट्टी देऊ नका : मनोज जरांगेंचा रोख नेमका कोणावर?

दरम्यान, आजच्या मनोज जरांगेंच्या मेळाव्यात अशा अपशब्दांचा मारा मोठया प्रमाणावर ऐकायला मिळाला. यापूर्वी त्यांनी मुंबईला उपोषणासाठी जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर कडवी टीका करताना आईचा उल्लेख केल्यानं त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. यावरुन भाजपचे नेते संतप्त झाले होते त्यांनी एकेककरुन जरांगेंना टार्गेट केलं होतं. त्यानंतर आजच्या नारायणगडावरील सभेतही त्यांनी शिवराळ भाषा वापरली. एखाद्यानं जर आपल्या जातीचा अपमान केला तर त्याला मरेपर्यंत त्याला झटका देत राहायचं. हे सांगताना जरांगेंनी तुम्हाला कडवट बनावं लागेल हे सांगताना शिवराळ भाषा वापरली. तसंच हैदराबाद गॅझेटमधील मराठा-कुणबी नोंदींना गुलामीचं गॅझेट म्हणणाऱ्या माकडं-औलादी अशा शब्दांत जरांगेंनी संबंधितांना प्रत्युत्तर दिलं. तसंच आमचं जर गुलामीचं गॅझेट असेल तर इंग्रज काय तुमच्या..... काय? आम्हाला गुलाम ठरवणाऱ्या पक्षात काम करणाऱ्या मराठ्याच्या पैदासी, करतो का प्रचार.... दहापाच लाखांच्या कामासाठी कधीपर्यंत....स्वाभिमान जागा ठेव. निझाम आमच्या कुटुंबातला नाही मग इंग्रज तुमच्या कुटुंबातील व्यक्ती आहे का? कारण तुम्हाला पण इंग्रजांच्या जणगणनेनं आरक्षण दिलं का? असं आम्ही म्हणायचं का? यासाठी....मराठ्यांनी तुम्हाला तीस वर्षे निवडून नाही दिलं.

Manoj Jarange
Manoj Jarange Patil : आरक्षण मिळालं, आता पुढे काय? जरांगेंचा दसरा मेळाव्यातून मराठा समाजाला संदेश

आजपासून ओबीसींना दोष द्यायचा नाही. एक जरी नेता बोलला तरी आपण त्यांना दोष देतो. यात त्या समाजाचा दोष नाही. पण त्यात एकाच....दोष आहे. त्याला काय करायचं आता, त्याला म्हशी सारखं थोड्या दिवस पाण्यात बांधायचं. मला फक्त नीट होऊ द्या. त्यांना तज्ज्ञांना घेऊन बसायला भाग पाडलं ना. इथून पुढे ज्या जातीचा नेता बोलेल त्याला ओबीसीचा नेता म्हणायचं नाही. त्याला ओबीसीचा नेता म्हटलं की तो म्हणतो आमच्या ओबीसीवर अन्याय होतो. पण ओबीसीला बोलायचं नाही त्या नेत्याची जात आणि त्यालाच फक्त टार्गेट करायचं.

Manoj Jarange
POK Protest update : पाकव्याप्त काश्मीर पेटलं, लष्कराच्या नाकीनऊ; राजनाथ सिंह यांचं विधान खरं ठरणार?

लय सहन केला ७५ आमच्या मराठ्यांच्या लोकांनी कसल्यानं पण यायचं आणि.....बास रे त्यासारखं जीवन नाही. तुमच्या हातात जितकं आहे ना तसंच आमच्याकडंही धारदार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com