Pratap Sarnaik Sarkarnama
मुंबई

BJP Vs Shivsena : शिंदेसेनेच्या 'या' मंत्र्यानं फडणवीसांविरोधात थोपाटले दंड; म्हणाले, 'अंतिम निर्णय माझाच...'

ShivSena Minister Pratap Sarnaik Bjp CM Devendra Fadnavis Chairman Maharashtra ST Corporation : एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून भाजप आणि शिवसेनेत कुरघोडीचे राजकारण रंगले आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद टोकाला पोचत आहे. परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी राजकीय नेत्यांची वर्णी लावण्याची प्रथा मोडीत काढताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री शिंदेसेनेवर कुरघोडी केली होती.

पण शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावर अंतिम निर्णय माझाच राहील, असे सांगून अध्यक्ष म्हणून त्यांनी निर्णय घेतला, तरी मंत्री म्हणून तो माझ्याकडेच येत असतो, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाला एकप्रकारे डिवचलं आहे.

शिवसेनेतील भरत गोगावले हे मंत्री झाल्याने एसटी महामंडळाचे अध्यक्षपद रिक्त होते. या पदावर राजकीय व्यक्तीची वर्णी लावल जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही प्रथा मोडीत काढत, या पदावर प्रशासकीय व्यक्ती बसवली. महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्र ज्येष्ठ सनदी अधिकारी यांच्याकडे सोपवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा निर्णय म्हणजे, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला राजकीय धक्काच होता.

यावर आता शिवसेनेचे (Shivsena) नेते तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, "एसटी महामंडळांचा अध्यक्ष हा राजकीय व्यक्तीच असतो. सनदी अधिकारी संजय सेठी यांची नियुक्ती तात्पुरती आहे. याबाबत कोणीही राजकीय भांडवल करू नये. परिवहन खात्याचा मंत्री मीच आहे. त्यामुळे माझाच निर्णय अंतिम राहील".

फडणवीसांकडून घोटाळ्याची दखल

एसटी महामंडळाच्या ताफ्यात 1 हजार 310 बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे अलीकडेच उघडकीस आले आहे. एसटीची आर्थिक स्थिती नाजूक असताना महामंडळात सुरू असलेल्या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एसटीच्या अध्यक्षपदी राजकीय नेत्याची अथवा आमदाराची वर्णी लावण्याचे टाळले आहे.

दोन-दोन ठिकाणी अर्ज भरले

माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर देखील मंत्री सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली. लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना जे निकष लावले आहेत, त्या निकषांचा कोणी गैरफायदा घेत असेल, तर योजनेचे पैसे परत करावे लागणार आहे. अर्जांची पडताळणी सुरू आहे. यात काही लाभार्थ्यांनी दोन-दोन ठिकाणी अर्ज भरल्याचे समोर आले आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

पैसे परत करण्याची तयारी

दोन ठिकाणी अर्ज भरलेल्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे देखील पडताळणीत समोर आले आहे. काही लाभार्थ्यांनी समोर येत असे प्रकार झाल्याचे मान्य केले आहे. असे प्रकार नजर चुकीने झाल्याचे मान्य केले आहे. काहींनी पैसे परत करण्याची, स्थानिक संस्थांकडे जमा करण्याची तयारी दर्शवली आहे, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT