Uddhav Thackeray,Sunil Prabhu, CM Shinde Sarkarnama
मुंबई

MLA Disqualification Case: 'सुनील प्रभूंनी जारी केलेला व्हीप बनावट'; शिंदे गटाच्या वकिलांच्या दाव्याने खळबळ

Ganesh Thombare

Mumbai News: शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडत आहे. मंगळवारी, बुधवारी अशी दोन दिवस विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी पार पडली. आता गुरुवारीही सुनावणी होणार आहे. दोन दिवस झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची‌ फेरसाक्ष आणि उलट तपासणी घेण्यात आली.

या सुनावणीदरम्यान दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये युक्तिवादादरम्यान जोरदार खडाजंगी झाली. तर सध्या सुरु असलेल्या सुनावणीला वेळ लागत असल्याने विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. अशा पद्धतीने सुनावणी पुढं जात असेल तर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करणं अवघड होईल, असेही नार्वेकर म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार अपात्रता प्रकरणाची बुधवारची सुनावणी संपल्यानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी मोठं विधान केलं आहे. "21 जून 2022 रोजी सुनील प्रभू (ठाकरे गटाचे प्रतोद) यांनी जारी केलेला व्हीप बनावट आहे", असं जेठमलानी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.

सुनावणीत नेमकं काय झालं ?

विधानसभा अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची‌ फेरसाक्ष आणि उलट तपासणी घेण्यात आली. यावेळी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी त्यांना विविध प्रश्न विचारले. त्यांवर प्रभू यांनी उत्तरं दिली, ती पुढील प्रमाणे....

जेठमलानी :

- उद्धव ठाकरे यांनी सूचना केल्यानंतर व्हीप बजावण्यात आलेले डॉक्युमेंट हेच आहेत का ?

सुनिल प्रभू :

- उद्धव ठाकरे यांनी आमदार मिसिंग असल्याचे कळवताच बैठकीसाठी बोलविण्याच्या सूचना केल्या होत्या, त्यानुसार मी हा व्हीप सर्व आमदारांना बजावला होता.

जेठमलानी :

- 20 जूनला झालेल्या सर्व शिवसेना पक्षाच्या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केले होते का ?

सुनिल प्रभू :

- सर्व शिवसेना आमदारांनी मतदान केले होते.

जेठमलानी :

- जर 20 जूनला सर्व शिवसेना विधानसभा आमदारांनी विधानपरिषद निवडणुकीत मतदान केले तर ते कोणते आमदार मिसिंग होते अस तुम्ही म्हणताय ?

सुनिल प्रभू :

- सर्व शिवसेना आमादारांनी मतदान केले होते, हे जर चेक करायचं असेल तर विधानभवनाच्या पटलावर हे दिसून येईल.

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बातम्या येत होत्या की, शिवसेनेचे काही आमदार मिसिंग आहेत. त्यानंतर संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच आमदारांचे फोन बंद होते. त्यानंतर हे आमदार गुजरात दिशेने गेल्याच्या बातम्या येत होत्या.

विधानसभा अध्यक्ष :

- प्रभू तुम्ही आम्हाला सांगा की, मिसिंग झालेले आमदार कोण होते ? तुम्ही म्हणताय की आमदार मिसिंगच्या बातम्या येत होत्या.

सुनिल प्रभू :

- मी ज्यांना हातोहात व्हीप द्यायला लावले जे मुंबईत उपस्थित होते. ज्यांचे फोन लागत नव्हते ते मिसिंग होते. त्यांना व्हीप पाठविणे आवश्यक होते, रात्रीपासून ते बैठकीपर्यंत मी व्हीप देण्याचा प्रयत्न करत होतो.

जेठमलानी :

- तुम्ही व्हीप ओरिजनल पाठवता त्यावेळेस ज्याला पाठवता त्याचे नाव लिहीत नाही का ?

सुनिल प्रभू :

- व्हीप आमदाराला पाठवला जातो, त्यावर कोणाचं नाव नसतं.

जेठमलानी :

- 20 जूनच्या आधी तुम्ही म्हणाला होतात की, तुम्ही दोन व्हीप जारी केले होते. त्याचा अर्थ हा व्हीप बनावटी आहे, असे तुम्हाला म्हणायचेय का?

सुनिल प्रभू :

- हे खोटे आहे.

जेठमलानी :

या विषयाच्या अनुशंगाने तुम्ही किती व्हीप जारी केले होते ?

सुनिल प्रभू :

- मला आठवत नाही.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT