MLA Disqualification: आमदार अपात्रतेच्या सुनावणीवेळी नार्वेकरांनी ठाकरे गटाच्या वकिलांना झापलं, नेमकं काय घडलं ?

Shivsena MLA Disqualification : ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांच्या युक्तिवादादरम्यान जोरदार खडाजंगी झाली.
Shivsena MLA Disqualification
Shivsena MLA Disqualification Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीदरम्यान दोन्ही गटांकडून कागदपत्रं सादर करण्यात येणार होते, पण ठाकरे गटाने कागदपत्रं सादर केले, तर शिंदे गटाने कागदपत्रं सादर करण्यासाठी आणखी वेळ मागितला. त्यानुसार त्यांना 24 तारखेपर्यंत वेळ देण्यात आला.

यानंतर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची‌ फेरसाक्ष घेण्यात आली. याचवेळी सर्व युक्तिवाद आणि आक्षेपाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केली. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी त्यांची ही मागणी धुडकावून लावली. तसेच "सतत व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची मागणी आपण करत आहात, मी तीन वेळा मागणी फेटाळल्यानंतरही आपण ही मागणी करत आहात, हे चुकीचे आहे," असा शब्दांत नार्वेकरांनी सुनावले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shivsena MLA Disqualification
MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट; अध्यक्षांसमोरील सुनावणीत काय घडलं ?

यानंतर सुनील प्रभू यांची‌ फेरसाक्ष घेण्यात आली, तर लेखी कागदपत्राद्वारे साक्ष दिली जाऊ शकत नाही, असा सवाल शिंदे गटाच्या वकिलांनी केला; पण याचवेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांच्या युक्तिवादादरम्यान जोरदार खडाजंगी झाली, तर दोन्ही वकिलांनी वैयक्तिक टीकाटिप्पणी केल्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच कायदेशीर मुद्दा मांडण्याचा सल्ला दिला.

सुनील प्रभू यांच्या उलटतपासणीत काय झालं ?

ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची‌ फेरसाक्ष घेण्यात आल्यानंतर वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांची उलटतपासणी घेतली. या वेळी सुनील प्रभू तुम्ही या अपात्रता याचिका इंग्रजीत दाखल केल्या का ? असा सवाल त्यांना विचारण्यात आला, तर त्यावर बोलताना 'मी याचिका दाखल मराठीत‌ केली, माझ्या वकिलाला सांगितलं, त्यांनी इंग्रजीत ड्राफ्ट करून दिली, असे उत्तर त्यांनी दिले.

तुम्ही याचिकांमध्ये कुठेही सांगितले नाही की मला हे मराठीत समजलं आहे, असा प्रश्न पुन्हा सुनील प्रभूंना विचारण्यात आला असता मी रेकॉर्डवर सर्व सांगितल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, इंग्रजी याचिकेवरून शिंदे गटाच्या वकिलांनी सुनील प्रभू यांना घेरण्याचा‌ प्रयत्न केला.

यानंतर तुम्हाला कोणत्या वकिलांनी अपात्रता याचिकेतील मुद्दे मराठीत समजावले ? असा सवाल सुनील प्रभू यांना जेठमलानी यांनी विचारला. यावर त्यांनी असिम सरोदे यांनी समजवाले असे सांगितले. मात्र, यावर ठाकरे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेत असे प्रश्न विचारू नयेत, अशी मागणी केली. पण त्यावर जेठमलानी यांनी तसे नाही चालणार, मी विचारणारच, असे प्रत्युत्तर दिले. त्यामुळे आजच्या सुनावणीवेळी दोन्ही गटांच्या वकिलांमध्ये युक्तिवादादरम्यान जोरदार खडाजंगी झाली.

(Edited By - Ganesh Thombare)

Shivsena MLA Disqualification
Maratha Reservation : जालन्याचे एसपी तुषार दोशींच्या बदलीवरून खडाजंगी; जरांगे-भुजबळ पुन्हा भिडले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com