Ambadas Danve Sarkarnama
मुंबई

Shivsena MLA Disqualification Case : ...या सगळ्या गोष्टी बघितल्या तर मनात नक्कीच शंकेची पाल चुकचुकते : अंबादास दानवेंचं मोठं विधान...

Mayur Ratnaparkhe

Thackeray Group Vs Shinde Group Maharashtra Politics : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी अंतिम निकाल बुधवारी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवाय केवळ राजकीय मंडळीच नाही, तर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे आहे.

20 डिसेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अवघा महाराष्ट्रच नव्हे, तर सारा देश निकाल ऐकण्यास उत्सुक आहे. शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार अपात्र ठरणार की ठाकरे गटाचे? शिंदे सरकार जाणार की राहणार? का याप्रकरणी वेगळाच निकाल लागणार? याचं उत्तर मिळणार आहे. या निकालासाठी शिंदे आणि ठाकरे गटाचे सर्व आमदार, नेते विधान भवनात दाखल झाले असून, विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मीडियाशी बोलताना मोठं विधान केलं आहे. 'निकाल ऐकायला आम्ही आलेलो आहोत. निकाल ऐकत असताना निकाल किती तारखेला लागला. चालढकलपणा किती झाला? वेळकाढूपणा किती झाला, हे सगळ्या महाराष्ट्राला नव्हे, तर देशाला माहीत आहे. असं असताना जे न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत आणि ज्यांच्यावर आरोप आहेत, थोडक्यात ज्यांना आरोपी म्हणता येईल असे जे 16 लोक आहेत. म्हणजे प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांची भेट हे न्यायाधीशांच्या भूमिकेत असलेल्या अध्यक्षांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेली आहे.'

याचबरोबर 'जर असा आरोप केला की न्यायाधीश आरोपींनाच भेटायला जातात, दबाव टाकला असं सांगितलं जातं. परंतु मला असं वाटतं ज्या पद्धतीने वेळकाढूपणा, चालढकलपणा ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांच्याशी भेटीगाठी या सगळ्या गोष्टी बघितल्या तर मनात नक्कीच शंकेची पाल चुकचुकते. परंतु तरीही न्यायाची अपेक्षा आहेच,' असंही दानवे म्हणाले.

याशिवाय 'आता काहीजण सांगतात, की आम्ही बिनधास्त आहोत. मला असं वाटतं, जेव्हा न्याय मिळतो तेव्हा दोन्ही बाजूंना दिलासा वाटायला हवा... परंतु एक बाजू इथे बिनधास्त आहे, याचाच अर्थ न्याय काय देणार, हे अगोदर बाहेर आलेलं आहे की काय, अशी शंका जनतेच्या मनात आहे ती आमच्याही मनात आहे,' असंही दानवेंनी सांगितलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT