Chhatrapati Sambhajinagar : अंबादास दानवे, इम्तियाज जलील अन् हरिभाऊ बागडेंचे 'या' प्रकरणात जुळले सूर...

Political News : या जमीन खरेदी-विक्री व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी केली.
Ambadas Danve, Imtiaz Jalil and Haribhau Bagade
Ambadas Danve, Imtiaz Jalil and Haribhau Bagade Sarkarnama
Published on
Updated on

िMarathwada Political News : सध्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठका चांगल्याच वादळी आणि वादग्रस्त ठरत आहेत. हिंगोलीच्या डीपीडीसी बैठकीत सत्ताधारी मंत्री आणि खासदारांनीच एकमेकांचे वाभाडे काढत शिव्या हासडल्याचे प्रकरण समोर आले असतानाच छत्रपती संभाजीनगरची डीपीडीसी बैठक एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. हे प्रकरण म्हणजे अडीचशे एकर जमिनीच्या खरेदी-विक्री व या व्यवहाराची तातडीने शासन दफ्तरी झालेली नोंद आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील(Imtiaz Jaleel) आणि भाजप आमदार हरिभाऊ बागडे या तिघांचे या प्रकरणात सूर जुळल्याचे दिसून आले. या तिघांनी डीपीडीसी बैठकीत या जमीन खरेदी-विक्री व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी केली. शहरापासून काही अंतरावर असलेल्या अब्दीमंडी येथील 250 एकर निर्वासित मालमत्ता विकण्यात आली.

Ambadas Danve, Imtiaz Jalil and Haribhau Bagade
India Aaghadi News : मोठी बातमी ! इंडिया आघाडी जागा वाटप बैठक 14 किंवा 15 जानेवारीला होणार ?

तीन दिवसांत त्याचा फेरफारही करण्यात आला. यावरून गैरव्यवहार झाल्याची शंका अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी बैठकीत उपस्थित केली. त्यांना खासदार इम्तियाज जलील यांची साथ मिळाल्याने या मुद्यावरून बैठकीचे वातवरण चांगलेच तापले होते. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी खुलासा करावा, अशी मागणी दानवे-इम्तियाज यांनी केला, त्याला भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनीही साथ दिल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, या प्रकरणावर अल्पसंख्याक विकास, पणन व वक्फमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दानवे-इम्तियाज यांनी त्यांना रोखत अधिकाऱ्यांना उत्तर देऊ द्या, तुम्ही शांत बसा, असे सुनावले. अब्दीमंडी येथील जमिनीच्या फेरफार आणि खरेदी-विक्री व्यवहाराबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. नव्याने होणाऱ्या रस्त्याच्या भूसंपादनातून कोट्यवधीचा निव्वळ नफा मिळवण्यासाठी हा घाट घालण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अंबादास दानवे यांनी या विषयाकडे लक्ष वेधले. अब्दीमंडी येथील निर्वासित जमिनीची अवैध खरेदी-विक्री झाली आहे. या भागातील गट क्रमांक 11, 12, 26, 36 आणि 42 मधील 250 एकर जमीन जिची नोंद निर्वासित जमीन अशी होती. तसेच, महसूल विभागाने तिथे शत्रू जमीन म्हणून फलक लावले आहेत. तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्या अधिकारात खासगी व्यक्तीच्या नावाखाली नोंद घेतली.

जमिनीची विक्री होऊन फेरफार दुसऱ्या खासगी व्यक्तीच्या नावाने कसा झाला? हे सगळे प्रकरण संशयास्पद असून याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे अपील दाखल करून दोन महिने उलटले, मात्र अजून एकही सुनावणी झाली नाही. या सर्व प्रकरणात कुठेतरी पाणी मुरते आहे. या जमिनीतून भूसंपादनाचा पैसा मिळावा, यासाठीचे हे षड्यंत्र असण्याची शक्यताही दानवे यांनी बैठकीत व्यक्त केली. यावर पालकमंत्री यांनी खुलासा करावा, अशी मागणीही दानवे यांनी केली.

(Edited By Deepak Kulkarni)

R...

Ambadas Danve, Imtiaz Jalil and Haribhau Bagade
Nitesh Rane : नीतेश राणे म्हणाले, मोहोळ कुटुंबाला आधार देण्यासाठी आलोय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com