Shrikant Shinde, Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

Shrikant Shinde on Uddhav Thackeray : गोऱ्हे, कायंदे, सातमकर यांच्यासारखे मातब्बर नेते आपल्याला का सोडून जातात ? ; शिंदेंचा ठाकरेंना सवाल

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray Thane Sabha : ठाणे शहरातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शनिवारी शिंदे गट, भाजपवर तोफ डागली. ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "काही जणांना वाटतं आम्ही म्हणजे ठाणे, तर तसं नाही," असेही ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या या विधानाला खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. शिंदे कल्याणमध्ये माध्यमांशी बोलत होते.

"निवडणुका व्हायच्या तेव्हा त्या होतील मात्र, आपल्याला लोक का सोडून जात आहेत, याचा विचार कधी करणार आहात की नाही. इतकी लोकं सोडून गेली याचे आत्मपरीक्षण करा, नेमकं ते आपल्याला का सोडून जातात ? आपलं काय चुकतयं हे शोधा," असा उपहासात्मक सल्ला श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

"कोणी कुठेही मेळावा घेऊ शकतो. त्याच्याबद्दल मी काय बोलणार ? मेळाव्यामध्ये ते काय बोलले ते मला माहिती नाही. आपला पक्ष वाढवायची मुभा ही सर्वांना आहे," असे शिंदे म्हणाले. ठाकरे गटातील मंगेश सातमकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 'एकेकाला काय फोडता हिंमत असेल तर निवडणुका घ्या," असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह भाजपाला केले आहे. या आव्हानाला खासदार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.

"नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, मंगेश सातमकर यांच्यासारखे मातब्बर नेते सोडून जातात याचे आत्मपरीक्षण करणार की नाही," असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंना केला

"आपण साडेतीन वर्ष अगोदर ज्या काही गोष्टी सत्तेसाठी केल्या, तडजोडी केल्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची मोडतोड केली. त्यानंतर इतके लोक आपल्याला सोडून जातात, तरीही मीच कसा बरोबर आहे, हे रोज समोर जाऊन सांगावं लागतयं. आपलं बरोबर असतं तर इतके लोक सोडून गेले नसते आपण आधी आत्मपरीक्षण करा," असा सल्ला शिंदेंनी ठाकरेंना दिला.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT