Datta Samant Murder Case : दत्ता सामंत हत्या प्रकरणात साक्षीदार फितूर झाल्याने छोटा राजनची मुक्तता

Crime News : या प्रकरणात राजन याच्यावर स्वतंत्र खटला चालवण्यात आला.
Datta Sawant Murder Case
Datta Sawant Murder CaseSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : गिरणी कामगार चळवळीचे नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन याची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणातील महत्वाचे साक्षीदार फितूर झाल्याने छोटा राजन याची या प्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

१९९७ मध्ये डॉ. दत्ता सामंत यांची हत्या झाली. याप्रकरणात छोटा राजन हा आरोपी आहे. राजन याने सामंत यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप सीबीआयने केला होता. याप्रकरणी जुलै २००० मध्ये निकाल देण्यात आला होता. या प्रकरणात राजन याच्यावर स्वतंत्र खटला चालवण्यात आला.

Datta Sawant Murder Case
Sharad Pawar Visit PM Modi : शरद पवार हे मोदींसाठी पुण्यात थांबणार की केजरीवालांची विंनती मानणार ?

याप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी डॉ. सामंत यांच्या चालकासह खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले, त्यांनी सीबीआयच्या दाव्याला समर्थन देण्यास नकार दिला. राजन याची या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली असली तरी त्याच्यावर बरेच खटले सुरू असल्याने तो कारागृहातच राहणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Datta Sawant Murder Case
Manipur Violence : मणिपूर घटनेबाबत CBI तपासाची सूत्रे फिरली ; गुन्हा दाखल

"आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यासाठी अन्य साक्षीदारांची साक्ष पुरेशी नाही," असे ताशेरे न्यायालयाने सीबीआयच्या तपासावर ओढले आहेत. १६ जानेवारी १९९७ रोजी सामंत यांची पंतनगर (घाटकोपर) येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सामंत हे त्यांच्या गाडीने कार्यालयात जात असताना हा हल्ला करण्यात आला होता. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर १७ गोळ्या झाडल्या होत्या.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com