Ramdas Kadam on Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Ramdas Kadam on Uddhav Thackeray : 'शिंदेंना मुख्यमंत्री करायचं ठरलं, अन् इकडं बाप-लेकानं..'; रामदास कदमांनी इतिहास काढला!

Shivsena Ramdas Kadam Criticizes Uddhav Thackeray and BJP Devendra Fadnavis in Ratnagiri : शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर भाष्य केले आहे.

Pradeep Pendhare

Ramdas Kadam Ratnagiri News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते अन् मंत्र्यांनी अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीकास्त्र सुरू ठेवलं आहे. मंत्री भरत गोगावले यांच्यानंतर आता शिवसेनेचे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचं ठरलं असताना, उद्धव ठाकरेंनी रात्रीतून निर्णय फिरवला अन् बाप-लेक मंत्रि‍पदावर जाऊन कसे बसले, याचा इतिहास काढत टीका केली.

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधताना, हॉटेल रिट्रीटमध्ये आमदारांची सभा झाली, त्या सभेत शिवसैनिक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं आहे, असं उद्धव ठाकरे यांनीच म्हटलं होतं. पण एका रात्रीत असं नेमकं काय घडलं की, एकनाथ शिंदे यांना बाजूला करून उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले, याची अधिक माहिती घेतली, तर मंत्री भरत गोगावले काय म्हणाले ते कळेल, असा टोला रामदास कदमांनी लगावताना पुन्हा रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधला.

''वर्षा'चे डोहाळे नेमकं कोणाला लागले हे स्पष्ट होईल. बाप मुख्यमंत्री अन् बेटा कॅबिनेट मंत्री आणि नेता रामदास कदम आउट. सगळा महाराष्ट्र आश्चर्यचकित झाला. शिवसेना (Shivsena) प्रमुखांनी हयातभर कुठलाही पद घेतलं नाही. सगळी पदे शिवसैनिकांना दिली', याची आठवण रामदास कदम यांनी यावेळी करून दिली. बाळासाहेब असते, तर हे होऊ दिलं नसतं, असेही रामदास कदम यांनी म्हटले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर प्रतिक्रिया देताना, शरद पवार परिपक्व राजकीय नेते असून, कोणत्या वेळेला कोणता निर्णय घ्यायचा, याबाबत त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेला संभ्रमात ठेवण्यापेक्षा, त्यांनी एक घाव दोन तुकडे केले. 'मातोश्री'वर या उलट सुरू आहे, असेही कदम यांनी म्हटले.

'मनसे'बरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या सुरू असलेल्या युतीच्या चर्चेवर बोलताना, 'महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे, ते होईल', या उध्दव ठाकरेंच्या वक्तव्यावर रामदास कदम यांनी टीका केली. 'मनसे'चे सहा नगरसेवक फोडले ते महाराष्ट्राच्या मनात होत का? वरळीत तुमचा मुलगा उभा राहिला, त्याला 'मनसे'ने पाठिंबा दिला आणि राज यांचा दादरमधून उभा राहिला तेव्हा तुम्ही त्याला पडलात. मुंबईतील मराठी माणूस उध्दव ठाकरेंमुळे हद्दपार झाला आहे. महापालिका उध्दव ठाकरेंकडे कधीच येणार नाही, असा दावा देखील रामदास कदम यांनी केला.

फडणवीसांच्या निर्णयावर खोचक प्रतिक्रिया

मंत्र्यांच्या खासगी PA वरून रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावर खोचक प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो. तोलून-मोजून-मापून निवडायचं, त्यांच्याकडे यंत्र असेल तर अधिक चांगल आहे. भ्रष्टाचार थांबवण्याचे काम मुख्यमंत्री करत असतील, तर त्यांचे अभिनंदन आहे, असा टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT