Deepak Kesarkar, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Shivsena On INDIA Meet 'इंडिया'च्या बैठकीचा निषेध; शिंदे गट शरद पवार, उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक

Deepak Kesarkar And Gajanan Kirtikar : इंडियाला पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवता येत नाही

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Political News : 'इंडिया'तील पक्षांत विरोधाभास आहे. मुंबईत होणाऱ्या बैठकीत दुःखद चित्र म्हणजे हिंदुत्वाविरोधात भूमिका घेणाऱ्या पक्षांच्या नेत्यांच्या स्वागतासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वागत करणार आहेत. ठाकरे दिशाहीन, उद्दाम अशा राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर ज्यांच्या विरोध केला त्या नेत्यांच्या स्वागतासाठी ठाकरे पायघड्या टाकणार आहेत, अशी टीका शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे खासदर गजानन कीर्तीकर आणि मंत्री दीपक केसरकरांनी केली आहे. 'इंडिया'च्या बैठकीपूर्वीच शिंदे गटाने घेतलेल्या या भूमिकेमुळे ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील पक्ष आक्रमक होऊन शाब्दिक चकमकीची शक्यता आहे. (Latest Political News)

भाजप विरोधी आघाडी 'इंडिया' (INDIA )ची गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबईत तिसरी आणि महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीचा निषेध शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला. कीर्तीकर आणि केसरकरांनी ठाकरेंवर निशाणा साधून 'इंडिया'तील पक्षांवर सडकून टीका केली. केसरकर म्हणाले, "सेल्युलर तुरुंगातील स्वातंत्र्यवीर सावकरांची पाटी काढल्यानंतर मणिशंकर अय्यरांना बाळासाहेबांनी मुंबईत पाय ठेवू दिला नव्हता. पक्ष विसर्जित करू पण काँग्रेससोबत जाणार नाही, हे बाळासाहेबांचे विचार पायदळीला तुडवले जात आहेत" असे सांगून केसरकरांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना लक्ष्य केले.

केसरकर म्हणाले, "पाच वर्षांचे मुख्यमंत्री दिले तर भाजपसोबत पुन्हा युती करण्याची त्यांची तयारी होती. तर २०१४ मध्ये कुणालाही निर्विवाद बहुतमत नसताना शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता. आज आलेले नेते बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊन वंदन करणार का? सावरकरांचा केलेल्या अपमानाबद्दल माफी मागणार आहेत का? आज ठाकरे ३७० वर चर्चा करण्यची हिमंत आहे का?"

'इंडिया'त सहभागी पक्षांचीही केसरकरांनी खिल्ली उडवली. गॅसच्या किमती तुम्हाला घाबरून कमी केल्या. अरुणाचल प्रदेशमधील चीनचे सैन्य आम्ही मागे खेचू ही तुमची विधाने हस्यास्पद आहेत. दीपक केसरकर म्हणाले, "भारत-चीन सीमेवर मोठे प्रकल्प राबवून चीनला धडकी भरली आहे. आज जगातील सर्व देश भारतात गुंतवणूक करायला तयार आहेत. त्यामुळेच तुम्हाला बेरोजगारी आठवली का? पेट्रोल स्वस्त करण्यासाठी केंद्राने कर कमी केला मात्र तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरेंनी तो निर्णय घेतला नाही. आता शिंदेच्या सरकारमधे तो निर्णय घेतला. शस्त्रास्त्र निर्मितीत भारत स्वयंपूर्ण होत आहे. प्रगती ब्रिटीशांनी केली हे म्हणताना तुम्हाला लाज नाही का वाटत?"

'इंडिया'वर टीका करताना केसरकरांनी सगळा इतिहासच सांगितला. "तुम्ही 'यूपीए'मध्ये मोठे भ्रष्टाचार केल्यानेच नाव बदलले. अण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनानंतर देशता सत्तांतर झाले. तुम्हाला देशातील लोकांनी कधीच स्वीकरले नाही. राजकारण विचारांवर चालते. तु्म्हाला तुमचा पंतप्रधान ठरवता येत नाही. दिवसात चार-चार पंतप्रधान होतात. जी लोक महाराष्ट्राविरोधात बोलत होती, तीच लोक एकत्र येत आहेत. ही लाचारी महाराष्ट्राला मान्य आहे का?", असा प्रश्नही केसरकारंनी ठाकरेंना विचारला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT