HC On City Renaming: मोठी बातमी : औरंगाबाद, उस्मानाबाद मूळ नाव कायम; न्यायालयाकडून याचिका निकाली; राज्य सरकारकडून अधिसूचना नाही..

Aurangabad Osmanabad City Renaming Case: आपल्या युक्तिवादाशी संबंधित कागदपत्रे व निवाड्यांच्या प्रती आधीच न्यायालयात जमा कराव्यात, असेही खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
Mumbai High court News
Mumbai High court NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे धाराशिव (Dharashiva) करण्याचा निर्णय राज्यातील सरकारने घेतला होता. त्यानंतर केंद्राने देखील त्याला मंजुरी दिली. औरंगाबाद जिल्हा व महसूल विभागाचे तसेच उस्मानाबाद जिल्ह्याचेही मूळ नाव कायम राहणार आहे.

दोन्ही जिल्ह्यांच्या व महसूल विभागाच्या नामांतराची अंतिम अधिसूचना राज्य सरकारने काढली नसल्याचे स्पष्ट करून मुंबई उच्च न्यायालयाने आव्हान याचिका निकाली काढली.

Mumbai High court News
Eknath Shinde News : फॉर्म्युला ठरला ; अजितदादा-फडणवीस-मुख्यमंत्री शिंदे असा असेल फायलींचा प्रवास ; वित्त विभागाने नाकारलेल्या...

आता दोन्ही शहरांच्या नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अनुक्रमे चार व पाच ऑक्टोबरला अंतिम सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठात ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mumbai High court News
Swabhimani Shetkari Sanghatana News : 'स्वाभिमानी'चे प्रशांत डिक्कर उपोषण मंडपातून बेपत्ता ; प्रशासनाची धावपळ

या दोन्ही शहरांच्या नामांतराविरोधात याचिका केलेल्या याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादाशी संबंधित कागदपत्रे व निवाड्यांच्या प्रती आधीच न्यायालयात जमा कराव्यात, असेही खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या बाबतीत उपविभाग, तालुका व गावस्तरावर नामांतर करण्याच्या प्रक्रियेबाबतची अंतिम अधिसूचना अद्याप आलेली नाही.

या प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिका सध्या निरर्थक ठरत असल्याने निकाली काढाव्यात, अशी विनंती राज्य सरकारतर्फे राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्या निकाली काढल्या. राज्य सरकारकडून अंतिम अधिसूचना काढल्यानंतर त्याला आव्हान देण्याची मुभा न्यायालयाने याचिकाकर्त्यांना कायम ठेवली आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com