INDIA Mumbai Meet : मोदींना टक्कर देण्यासाठी 'इंडिया'च्या बैठकीत होणार 'हे' महत्वाचे निर्णय !

Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole : जागावाटप, लोगोचे अनावरण; संवेदनशील मुद्दे टाळण्याची शक्यता
India Alliance
India AllianceSarakarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : मुंबईत गुरुवार आणि शुक्रवारी असे दोन दिवस विरोधी आघाडी 'इंडिया'ची तिसरी बैठक पार पडत आहे. पाटणा, बेंगुळुरुनंतर होणाऱ्या या बैठकीत दोन पक्षांची वाढ होऊन हा 'इंडिया'तील पक्षसंख्या २८ झाली आहे. देशातील विविध राज्यांचे सहा मुख्यमंत्री आणि ६३ प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पुढील रणनीतीबाबत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने 'लोगो'चे अनावरण आणि जागावाटपावर चर्चा होणार असून त्यासाठी काय निकष लावणार, याकडे देशाचे लक्ष आहे. (Latest Political News)

'इंडिया' (I.N.D.I.A.) आघाडीच्या सदस्य पक्षांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला आव्हान देण्यासाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीत सत्तांतर करण्याच्या उद्देशानेच आम्ही सर्व एकत्र आल्याचा दावा भाजपविरोधी पक्ष करतांना दिसत आहेत. त्यासाठी एका छत्राखाली काम करण्याच्या उद्देशाने मुंबईत 'इंडिया'चा लोगोचे अनावरण करण्यात येईल. तसेच २८ पक्षांत समन्वय राखण्यासाठी एक समिती आणि एक संयुक्त कृती आराखडा अंतिम करण्याची अपेक्षा आहे.

India Alliance
Rajasthan Politics : मोदी सरकारमधील नवे कायदामंत्री अडचणीत ? मुख्यमंत्री गहलोत यांनी दिले चौकशीचे संकेत

दरम्यान, 'इंडिया'त संयोजक असावा, आणि त्यापदी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांची निवड होण्याची चर्चा होती. मात्र या पदावर काम करण्याची अजिबात इच्छा नसल्याचे त्यांनी सांगितले. नितीश कुमारांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंच्या नाव पुढे आले, मात्र त्यांना आघाडीतून विरोध होण्याची शक्यता होती. परिणामी संयोजक असावे की नसावे यासह आणि २०२४च्या निवडणुकीसाठी संयुक्त कृती वेळापत्रक ठरण्याची शक्यता आहे. एक समन्वयक समिती स्थापना करण्यावर चर्चा होऊन कुणाकुणाची वर्णी लागणार, त्यांच्याकडे काय जबाबदारी देण्यात येईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

India Alliance
Balaji Kinikar News : उल्हासनगरमध्ये शिवसेना आमदार अन् राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकामध्ये खडाजंगी

'इंडिया'च्या माध्यमातून पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याच्या मागणीने जोर धरला होता. यासाठी काही नेत्यांच्या नावांचीही चर्चा होती. यातच आम आदमी पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्याने 'इंडिाया'त वादाची ठिणगी पडण्याची शक्यता होती. मात्र त्यांनी आपली भूमिका गुंडाळल्याने हा वाद आतातरी टळल्याचे बोलले जात आहे. या संवेदनशिल मुद्यावर नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी "देशात राजकीय बदल घडवून आणण्यासाठी विरोधी आघाडी एक मजबूत पर्याय देईल, असा विश्वास आहे. इंडिया आघाडीमध्ये जागावाटपावर कोणतीही चर्चा झालेली नाही," असे सांगितले. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banergee) म्हणाल्या, "भारत हा आमचा पंतप्रधान चेहरा असेल. आमची प्राथमिक चिंता देशाला वाचवणे आहे."

India Alliance
Arvind Kejriwal News: 'इंडिया' आघाडीत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत 'हे' तीन चेहरे? केजरीवालांची तडकाफडकी माघार...

'इंडिया'च्या बैठकीत या विषयावर होणार चर्चा

- 'इंडिया' आघाडीच्या लोगो अंतिम होणार

- समन्वय समितीची स्थापना केली जाणार

- निवडणूक व्यवस्थापन संदर्भात चर्चा होणार

- आघाडीच्या मुख्य पाच ते दहा प्रवक्त्यांची नेमणूक केली जाणार

- मीडिया आणि सोशल टीम वर चर्चा होणार

- राष्ट्रीय अजेंडासाठी एक समिती स्थापन केली जाणार

- जॉईंट ॲक्शन शेड्युल तयार केला जाणार

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com