ShivShena Eknath Shinde sarkarnama
मुंबई

Shivsena Third List : मोठी बातमी! शिवसेनेची तिसरी यादी जाहीर; मुंबादेवी, संगमनेर यांसह 15 'हाय व्होल्टेज' लढतींचे शिलेदार ठरले

Shivsena Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तिसऱ्या यादीत सेनेचे 13 उमेदवार जाहीर करण्यात आले असून दोन जागी मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आले आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठीची तिसरी यादी जाहीर केली आहे.शिंदेंकडून पहिली यादी ही 45, दुसरी यादीही 20 आणि आता तिसरी यादीही 15 जणांची जाहीर करण्यात आली आहे.

यात 13 शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार असून 2 जागा या मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत. मंगळवारी(ता.29)अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटचा दिवस असून आत्तापर्यंत शिवसेनेकडून एकूण 80 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या या यादीत सिंदखेडराजा- शशिकांत नरसिंगराव खेडेकर, घनसावंगी- हिकमत उढाण,कन्नड- रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव,कल्याण ग्रामीण- राजेश मोरे, भांडूप पश्चिम- अशोक पाटील, मुंबादेवी- शायना एनसी, संगमनेर-अशोक खताळ, श्रीरामपूर- भाऊसाहेब कांबळे, नेवासा- विठ्ठलराव लंघे, धाराशिव- अजित पिंगळे, करमाळा- दिग्विजय बागल, बार्शी - राजेंद्र राऊत,गुहागर- राजेश बेंडल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या पहिल्या यादीत एकूण 45 नावं जाहीर करण्यात आली होती. तर त्यात दादा भुसे,उदय सामंत, गुलाबराव पाटील यांच्यासह स्वतःचीही उमेदवारी एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता.

तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करताना वरळी,अंधेरी पूर्व, रिसोड, पुरंदर, कुडाळ आदी मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केली होती.त्यात मिलिंद देवरा (वरळी), मूरजी पटेल (अंधेरी पूर्व), भावना गवळी (रिसोड) यांसारख्या प्रमुख नेत्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

महायुतीतील भाजपने आत्तापर्यंत एकूण 146 आणि 4 मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 49, शिवसेनेकडून एकूण 80 अशा एकूण 279 जागांवरचे उमेदवार घोषित केले आहे. तर अजूनही महायुतीतील 8 जागांवरचे उमेदवार बाकी असून त्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT