Mahayuti : भाजपच 'बॉस'..! एकाच दिवसांत 2 याद्या; शिंदे-दादांवर प्रेशर? पण छोट्या मित्रपक्षांची राखली 'मर्जी'

Maharashtra Assembly Elections: भाजपने सोमवारी (ता.28) दुपारी आणि संध्याकाळी अशी उमेदवारांची अनुक्रमे तिसरी आणि चौथी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये तिसर्‍या यादीत 25 नावांचा समावेश असून चौथ्या यादीत जबरदस्त गेम खेळला आहे.
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी (ता. 29) शेवटचा दिवस बाकी आहे.अजूनही काही जागांवरुन महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे शेवटच्या काही तासांमध्ये मविआ उमेदवारांची घोषणा करुन इच्छुकांवर बॉम्ब टाकण्याची शक्यता आहे.

यातच आता महायुतीत भाजपने (BJP) एकाच दिवसात दोन याद्या जाहीर करुन मित्रपक्षांना धक्का दिल्याची चर्चा आहे. पण याचवेळी छोट्या भावांचीही मर्जी सांभाळल्याचेही दिसून येत आहे.

भाजपने सोमवारी (ता.28) दुपारी आणि संध्याकाळी अशा उमेदवारांची अनुक्रमे तिसरी आणि चौथी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये तिसर्‍या यादीत 25 नावाचा समावेश असून चौथ्या यादीत घटक पक्ष असलेल्या बडनेरामध्ये रवी राणांना भाजपचा पाठिंबा,गंगाखेडमध्ये 'रासप'च्या रत्नाकर गुट्टे, शाहूवाडीतून जन सुराज्य शक्ती पक्षाच्या विनय कोरे यांसह कलिनामध्ये रिपाई आठवले गटाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या यादीत 99 तर दुसऱ्या यादीत 22 तर तिसऱ्या यादीत 25 अशा एकूण 146 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या या तिसऱ्या यादीत तीन विद्यमान आमदारांना डच्चू दिला असून पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या नेत्यालाही संधी देत निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Madha Assembly Constituency: प्रतीक्षा संपली...माढ्यातून अभिजीत पाटील यांना तुतारीची उमेदवारी

महायुतीतील (Mahayuti) भाजपने आत्तापर्यंत एकूण 146 आणि 4 मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा,अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 49, शिवसेनेकडून एकूण 65 अशा एकूण 264 जागांवरचे उमेदवार घोषित केले आहे. तर अजूनही महायुतीतील 24 जागांवरचे उमेदवार बाकी असून त्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महायुती असो वा महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूच्या सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे.यामुळे बंडोबांना शांत करण्याची मोहीम पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना हाती घ्यावी लागली आहे.महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम असतानाच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Pune BJP : पुणे जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात भाजपच्या दोघांची बंडखोरी; उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच अपक्ष अर्ज दाखल

भाजप महाराष्ट्रात 'गुजरात पॅटर्न' राबवणार आणि 30 ते 40 टक्के आमदारांचे तिकीट कापणार, अशी चर्चा होती. मात्र, भाजपने जाहीर केलेल्या याद्यांमध्ये भाजपपणे विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट संधी दिल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे लोकसभेला पराभूत झालेल्या किंवा डावलेल्या उमेदवारांनाही विधानसभेला तिकीट मिळणार नसल्याची चर्चा होती. मात्र,लोकसभेला पराभूत झालेल्या विद्यमान आमदारांनाही भाजपने पुन्हा विधानसभेचे तिकीट देत मैदानात उतरवलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com