Aditya Thackeray On Mumbai University Senate Election Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray : "100 टक्के स्ट्राइक रेट, इथूनच..." मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीतील विजयावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Jagdish Patil

Aditya Thackeray On Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या (Shivsena UBT) युवासेनेचा एकतर्फी विजय झाला आहे. युवासेनेने 10 पैकी 10 जागांवर विजय मिळवला आहे.

या निवडणुकीतील घवघवीत यशामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेचा कॉन्फिडन्स वाढल्याचं पाहायला मिळत आहे. तर इथूनच निवडणुकीच्या विजयाचा सिलसिला सुरू होतो, असं सूचक ट्विट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट केल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) सिनेट निवडणुकीचा शुक्रवारी (ता.27 सप्टेंबर) निकाल लागला. या निवडणुकीत युवासेना (Yuvasena) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीवरून चांगलंच राजकारणही तापलं होतं. जे कार्टापर्यंत पोहोचलं होतं.

मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने आपल्या वर्चस्वाची परंपरा कायम ठेवल्याचं पाहायला मिळालं. तर याच निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना (UBT) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक सूचक ट्विट केलं आहे.

यामध्ये त्यांनी इथूनच आपली विजयी घौडदौड सुरू झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्टिटमध्ये ठाकरेंनी लिहिलं, "10 पैकी 10 जागा पुन्हा एकदा! ज्यांनी आम्हाला मतदान केलं, त्या सर्वांचे, युवासेनेच्या सहकाऱ्यांचे, तुमच्या विश्वास, पाठिंबा प्रयत्न आणि आशीर्वादाबद्दल मनःपूर्वक आभार.

मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीत आपल्या कामगिरीची केवळ पुनरावृत्ती नव्हे तर सुधारणा केली आहे. आपला 100 टक्के स्ट्राइक रेट या निवडणुकीत असून इथूनच निवडणुकीच्या विजयाचा सिलसिला सुरू झाला आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार शनिवारी (ता. 28 सप्टेंबर) मातोश्री या निवास्थानी जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या वेळी उद्धव ठाकरे आता या नवनिर्वाचित विजयी उमेदवारांना कोणता कानमंत्र देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT