Sanjay Raut, Narendra Modi Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : महागाई, सामाजिक अशांतता अन् शेतकऱ्यांचं आंदोलन, 'सामना'तून राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Sanjay Raut On PM Modi : "महागाई हटविण्याच्या गमजा मारीत मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेत आले. आज दहा वर्षांनंतर काय स्थिती आहे? मोदींच्या पक्षाने ज्या 'महंगाई डायन'चा बागुलबुवा त्या वेळी उभा केला होता ती ‘महंगाई डायन’ त्यापेक्षा अधिक उग्र रूपात जनतेच्या बोकांडी बसली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 14 Dec : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) राजवटीत देशातील प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक समाजघटकांत अस्वस्थता आहे. महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि इतर आर्थिक धोरणे, केंद्रीय यंत्रणांचा दहशतवाद, धार्मिक-सामाजिक अशांतता हेच देशातील सध्याचे चित्र आहे, अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

शिवाय सरकारच्या भोंगळ कारभारामुळे देशातील जनतेवर कायदा हातात घेण्याची वेळ येणार असेच चित्र असल्याचंही राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावल्याच्या घटनेचा संदर्भ देत सामनामध्ये लिहिलं की, 'कायद्याची कठोर अंमलबजावणी करता येत नसेल तर लोकांना कायदा हातात घेऊ द्या आणि त्यांनाच काय करायचे ते करू द्या.

अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. मुंबईत ठिकठिकाणी पडलेला बेकायदा फेरीवाल्यांचा विळखा आणि तो सोडविण्यात सरकार तसेच इतर यंत्रणांना आलेले अपयश यावरून न्यायालयाने सरकारचे हे वस्त्रहरण केले. मुंबईच नव्हे तर राज्यात सर्वच शहरांमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नाही.

याच वस्तुस्थितीवर उच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान बोट ठेवले आणि राज्य सरकारचे कान उपटले. मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गावर असलेल्या बेकायदा फेरीवाल्यांना हटविण्याचे आदेश न्यायालयाने मध्यंतरी दिले होते. त्यानुसार कारवाईदेखील झाली होती, परंतु जे इतरत्र घडते तेच येथेही घडले.

हटविलेल्या फेरीवाल्यांनी पुन्हा तेथे त्यांचे बस्तान बसविले आणि त्यांना हटविणारी यंत्रणादेखील 'हाताची घडी तोंडाला कुलूप' लावून शांत बसली. सरकारच्या याच बेपर्वाईचा उच्च न्यायालयाने समाचार घेतला आणि ‘मग जनतेलाच कायदा हातात घेऊ द्या,' अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. आता न्यायव्यवस्थेनेच अशा शब्दांत बोलावे का? असा प्रश्न सामनातून उपस्थित केला गेता आहे.

जनतेवर कायदा हातात घेण्याची वेळ येणार

याच घटनेवरून मोदी सरकारवरही निशाणा साधला आहे. देशात मागील काही वर्षांत जे काही घडते आहे, घडविले जात असताना राज्यकर्ते ज्या पद्धतीने बघ्याची भूमिका घेत आहेत, त्यावरून आपल्या देशातील जनतेवर कायदा हातात घेण्याची वेळ येणार असेच चित्र आहे. मोदी सरकार बाता मोठमोठ्या करीत असले तरी सर्वच क्षेत्रांत देशाची आणि जनतेची अवस्था बिकट झाली आहे.

महागाई हटविण्याच्या गमजा मारीत मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेत आले. आज दहा वर्षांनंतर काय स्थिती आहे? मोदींच्या पक्षाने ज्या 'महंगाई डायन'चा बागुलबुवा त्या वेळी उभा केला होता ती 'महंगाई डायन' त्यापेक्षा अधिक उग्र रूपात जनतेच्या बोकांडी बसली आहे. एकीकडे महागाई आणि दुसरीकडे बेरोजगारी अशा कोंडीत जनता सापडली आहे.

शेतकऱ्याची अवस्थाही वेगळी नाही. शेतमालाला 'किमान वाजवी दर' देण्याचे आश्वासन 10 वर्षांपूर्वी देणारे मोदी आजही ते पूर्ण करण्यास चालढकल करीत आहेत, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर देशातील शेतकऱ्यांना भर थंडीत नवीन लढाईचे रणशिंग पुन्हा फुंकावे लागले आहे. मोदी राजवटीत देशातील प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक समाजघटकांत अस्वस्थता आहे.

महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि इतर आर्थिक धोरणे, केंद्रीय यंत्रणांचा दहशतवाद, धार्मिक-सामाजिक अशांतता हेच देशातील सध्याचे चित्र आहे. प्रश्न सुटण्याऐवजी वाढतच आहेत. त्यामुळे सरकार आणि राज्यकर्त्यांवरील जनतेचा विश्वास उडत असून हे असंच सुरू राहिलं तर देशातील जनता कायदा हातात घेऊ शकते, असं त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT