VBA News Video : राज्यात 75 लाख मते कशी वाढली? निवडणूक अधिकाऱ्यांनी 'वंचित'ला दिले उत्तर

VBA EVM prakash Ambedkar election commission : सहानंतर मतदान वाढेल त्याबाबत वंचितकडून विचारलेल्या प्रश्नाला नांदेड दक्षिण, औरंगाबाद पश्चिम आणि परंडा येथील आरओनी उत्तर दिले आहे.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

VBA News : विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सायंकाळी सहानंतर 75 लाख मतदान झाले. ही 75 लाख मते कशी वाढली? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन पक्षाकडून जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच निवडणूक आयोगाला करण्यात आला होता. तीन जिल्ह्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून वंचितला उत्तर देण्यात आले आहे. मात्र, निवडणूक आयोगाकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.

आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांशी आणि आर. ओ.(रिटर्निंग अधिकारी) यांच्याशी पत्रव्यवहार केला. परंतु, मुख्य निवडणूक आयुक्तांनी अद्याप आम्हाला उत्तर दिलेलं नाही. काही आर ओ यांनी सरकारी उत्तरे दिली आहेत. पण 75 लाख मते कशी वाढली याचे उत्तर मिळालेले नाही असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Prakash Ambedkar
Eknath Shinde Meet Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड! नाराजी दूर..? शिंदे CM फडणवीसांच्या भेटीला

नांदेड दक्षिण, औरंगाबाद पश्चिम आणि परंडा येथील आरओनी आमच्या पत्राला सरकारी पद्धतीची उत्तरे दिली आहेत. त्यातील समान भाग म्हणजे सदर माहिती दैनंदिन लिफाफामध्ये सील बंद करून सुरक्षा कक्षात जमा करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत आपल्याला माहिती उपलब्ध करून देणे शक्य नाही, असे आर. ओ यांनी उत्तरे दिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी यांनी सांगितले.

ॲड. आंबेडकर म्हणाले, आम्ही लिहिलेल्या पत्रात 20 तारखेला मतदान किती झाले याची आकडेवारी आणि 23 तारखेला सर्व मतदान जेव्हा मोजण्यात आले त्याची आकडेवारी निवडणूक आयोगाने द्यावी, अशी मागणी आम्ही केली होती. 20 तारखेला निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जी माहिती टाकण्यात आली आहे. त्यामध्ये संध्याकाळी सहानंतर 75 लाख मतदान झाले आहे असे सांगण्यात आले आहे. याबाबत आम्ही प्रश्न उपस्थित केला होता.

सायंकाळी सहानंतर किती मतदान झाले याची आकडेवारी निवडणूक आयोगाने द्यावी. संध्याकाळी सहा वाजता जे रांगेत होते या सगळ्यांना आपण पोलिंग बूथ वाईज स्लीप वाटली असेल, तर त्या किती वाटल्या याची माहिती द्या, कोणत्या अधिकारात आपण या स्लीप वाटल्या आहेत याबाबत माहिती द्या अशी मागणी आम्ही पत्र पाठवून निवडणूक आयोगाकडे केली असल्याचेही आंबेडकर सांगितले.

मतदान वाढीबाबत आम्हाला तीनही आरओ यांनी दिलेले उत्तरं ही सरकारी, समान आहेत. त्यामुळे प्रश्न असा होतो 75 लाख मते खरेच झाली होती का ? कायद्यात एकदा सायंकाळी 5 वाजून 59 मिनिटे झाले की निवडणूक प्रक्रिया थांबवावी लागते, दरवाजे बंद करावे लागतात, जे आत मध्ये आहेत त्यांना टोकन दिले जाते आणि जेवढ्या मतदारांना टोकन असते त्यालाच मतदान करण्याचा अधिकार असतो असे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Prakash Ambedkar
Eknath Shinde: शिंदेंच्या 'ठाण्या'वर भाजपचा डोळा; सेनेच्या बालेकिल्ल्यात पालकमंत्री पदावरून घमासान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com