Shivsena UBT News Sarkarnama
मुंबई

Shivsena UBT : 'असुरांचा संहार करायला मशाल हाती दे...' ठाकरे गटाचे प्रचार गीत लाॅन्च

assembly election Shivsena UBT : उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या गीत लाॅन्च करण्यात आले. असुरांचा संहार करायला मशाल हाती दे...सत्वरी भूवरी तू ये आहे ये, असे या गीताचे बोल आहेत.

Roshan More

Shivsena UBT : भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गीत तयार केले होते. आता या पक्षांच्या पाठोपाठ शिवसेना (यूबीटी) यांनी देखील नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी 'असुरांचा संहार करायला मशाल हाती दे...' हे प्रचार गीत लाॅन्च केले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे गीत लाॅन्च करण्यात आले. असुरांचा संहार कराया मशाल हाती दे.. सतवरी भूवरी ये ग अंबे.. सतवरी भूवरी ये.., असे या गीताचे बोल आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले, गेले दोन अडीच वर्ष आम्ही न्यायमंदीराची दार ठोठावत आहोत. हात दुखायला लागलेत. शेवटी जगदंबेलाच साकडं घातलं पाहिजे की आता तु तरी दार उघड.महिलांवरती अत्याचार होता आहे. मला खात्री आहे मनापासून हाक मारली की भक्तांच्या हाकेला आई धावून येते.

नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत उद्धव ठाकरे म्हणाले, जनतेच्या दरबारात ही लढाई सुरु झाली आहे. आपली आपुलकी माया आपुलकी असुद्या. सध्या जे काही अराजक माजलं आहे. सगळ्या गोष्टींचा अमित शाह यांचा समाचार दसरा मेळाव्यात घेणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT