New Delhi : एक-दोन वर्षे नव्हे तर तब्बल 56 वर्षांनी एका शहीद जवानाचा मृतदेह त्यांच्या घरी पोहचला. तोपर्यंत घरातील कुणीच त्यांचा मृत्यू झाल्याचे मान्य करायला तयार नव्हते. पण एवढी वर्षे त्यांच्या परतीची वाट पाहणारी पत्नी आणि मुलगा दोघांचेही निधन झाले होते. शेवटी नातवाने मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
ही कहानी आहे उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील शहीद जवान मलखान सिंह यांची. त्यांचा मृतदेह तब्बल 56 वर्षांनंतर हिमाचल प्रदेशातील रोहतांग भागात सापडला. मलखान सिंह हे हवाई दलामध्ये जवान होते. 1968 मध्ये एका विमान अपघातानंतर ते बेपत्ता होते. या विमानात एकूण 102 जवान होते. मलखान सिंह यांच्या बॅच क्रमांकाच्या आधारे त्यांचा मृतदेह ओळखण्यात आला. आणखी तीन जवानांचे मृतदेही सापडले आहेत.
मलखान सिंह हे सहारनपूर जिल्ह्यातील फतेहपूर गावांतील होते. विमान अपघात झाला तेव्हा त्यांचे वय 23 वर्षे होते. अपघातानंतर त्यांचा काहीच तपास लागत नव्हता. त्यांचा मृतदेहही आढळून आला न्हता. त्यामुळे त्यांचे आई-वडील, पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्य वर्षानुवर्षे त्यांची परतीकडे डोळे लावून बसले होते. पण एवढी वर्षे काहीच माहिती मिळाली नाही.
विमान अपघातानंतर मलखान सिंह यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मलखान सिंह यांचा काही पत्ता लागत नसल्याने पत्नी शीलावती यांनी मलखान यांचे लहान बधून चंद्रपाल सिंह यांच्याही विवाह केला. अपघात घडला त्यावेळी शीलावती गर्भवती होत्या, तसेच त्यांना एक दीड वर्षांचा मुलगाही होता.
मागील 56 वर्षे मलखान सिंह यांच्या कुटुंबाने त्यांना मृत घोषित केलले नव्हते. पण दोन दिवसांपूर्वी अचानक सैन्यदलाककडून मलखान यांचा मृतदेह सापडल्याचा निरोप आला आणि कुटुंबीय तसेच गावातील लोकांना अश्रू अनावर झाले. मलखान यांचा मृतदेह घरी आला होता, पण ते पाहण्यासाठी पत्नी आणि मुलगा नव्हते. दोघांचेही निधन झाले होते.
मलखान यांचे नातू गौतम यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. फतेहपूरमध्येच अंत्यसंस्कार झाले. यावेळी हजारो लोक उपस्थित होते. मलखान सिंह अमर रहे, असे नारे दिले जात होते. सरकारने मलखान यांना शहीद म्हणून दर्जा देण्याची मागणी कुटुंबातील सदस्य व गावातील लोकांनी केली आहे. तसेच कुटुंबालाही मदत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.