Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Mahesh Sawant Video :'बालिश पोरगा, बापाची पुण्याई...', 'त्या' नेत्याच्या मुलाला ठाकरेंचा आमदार नको नको ते बोलला

Mahesh Sawant Criticized Samadhan Sarvankar : आमदार सावंत म्हणाले, 'येड्यांची जत्रा भरली होती त्यामध्ये तो बालिश पोरगा आला होता.त्याला अजून राजकारणाला र माहीत नाही.

Roshan More

Mahesh Sawant News : माहीम मतदारंसघातून शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांचा पराभव उद्धव ठाकरेंचे उमेदवार महेश सावंत यांनी केला. या निवडणुकीतील तिरंगी लढत अमित ठाकरेंच्या मुलाला देखील पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे या मतदारंसघातील निवडणुकीतही राज्यात गाजली होती. मात्र, आता सदा सरवणकर यांचे पुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी महेश सावंत यांचा उल्लेख हफ्तेखोर आमदार असा केल्याने या मतदारंसघातील राजकारण पुन्हा तापले आहे.

समाधान सरवणकर यांनी केलेल्या आरोपाला आमदार महेश सावंत यांनी जहाल भाषेत उत्तर दिले आहे. आमदार सावंत म्हणाले, 'येड्यांची जत्रा भरली होती त्यामध्ये तो बालिश पोरगा आला होता. त्याला अजून राजकारणाला र माहीत नाही. तो बापाच्या पुण्याईवर तो नगरसेवक झाला.'

'त्याला कळत नाही हफ्ते घेऊन कोण मोठं झालंय. केवढ्याशा खोलीत राहत होते आणि आज कसले बंगले झाले आहेत. ते पैशाची फॅक्टरी होती की काय?, असा टोलाही समाधान सरवणकर यांना आमदार सावतं यांनी लगावला.

बालिस बहु बडबडला तशी अवस्था आहे त्यांची. स्वतःचे अस्तित्व नाही, वडिलांच्या जीवावर आजपर्यंत सगळं मिळालं. समाजामध्ये स्वतःचे अस्तित्वात करावं मग बोलावं, असे आव्हानही समाधान सरवणकर यांना महेश सावंत यांनी दिले.

'त्यांना कुठे काय विषय काढायचे हे माहीत नाही. आम्ही विरोधात विरोध करणारे लोक नाही. लोकांनी त्यांना घरी बसवलं आहे. त्यांच मानिसक संतुलन बिघडलं आहे.दोन महिने त्यांनी आराम करावा आणि मग परत राजकारणामध्ये यावे', असा टोलाही सदा सरवणकर यांच्या पराभवावर आमदार सावंत यांनी लगावला.

महापालिका निवडणुकीत पराभव करणार

राजकीय सूडबुध्दीने माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांना दादरकर जनताच धडा शिकवेल. आगामी महानगरपालिका निवडणूकीतही मतदार या अहंकारी पुत्राला घरी बसवतील असा मला पुर्ण विश्वास आहे, असे सांगत समाधान सरवणकर यांचा पराभव करणार असल्याचे आमदार सावंत म्हणाले.

जनता सुज्ञ आहे...

'निवडणूकीतील पराभव पचवू न शकलेल्या “असमाधानी” पुत्राची बाष्कळ बडबड…. सेनापती बापट मार्ग, कामगार क्रिडा भवन शेजारील दादर फुल बाजार आणि फुल व्यापाऱ्यांची स्व.मीनाताई ठाकरे मंडई येथील राजकीय बॅनरबाजी विरोधात महापालिका अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई यांना असह्य झाल्याने माझ्यावर खोटेनाटे आरोप करीत फालतू स्टंट करणाऱ्या माजी आमदार पुत्राने लक्षात ठेवावं….दादरकर जनता सुज्ञ आहे !', असे देखील आमदार सावंत यांनी ट्विट करत म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT