Maharashtra Legislative Council : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते तथा माजी मंत्री अनिल परब यांनी नियमांवर बोट ठेवत, शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे नाव न घेता, भाजपचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत कोंडी केली.
अनिल परब यांनी नियमांवर बोट ठेवत विधान परिषदेत महसूल राज्यमंत्र्यांचे निलंबन करण्याची हिंमत, ताकद मंत्री बावनकुळे यांनी दाखवावी, अशी मागणी केल्याने खळबळ उडाली. या मागणीवरून सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परंतु शेवटी मंत्री बावनकुळे यांनी उभे राहून आमदार परब यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यांनी डिटेल माहिती द्यावी. मी सभागृहात अधिवेशन संपण्यापूर्वी यावर निवेदन करेल, असे आश्वासन देत वेळ मारून नेली.
अनिल परब यांनी विधान परिषदेत वाळूचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, "आमदार वाळू पकडत आहेत. आमदार देखील लोकसेवेच्या व्याख्यामध्ये बसतो. पण महसूल राज्यमंत्री (Revenue) वाळू पकडतो आहे. मी तुमच्याकडे पाच प्रकरण देतो, पुढच्या तीन दिवसात! महसूल राज्यमंत्र्यांनी वाळू पकडली. आणि ती वाळू तुमच्या धोरणाप्रमाणे, जी तहसीलदाराने पाच ब्रास गरिबांना द्यायला पाहिजे, ती दिली नाही".
'आता माझा साधा प्रश्न आहे. जी ताकद, जी हिंमत, एक कणखर महसूलमंत्री म्हणून तुम्ही, तलाठी, तहसीलदार, आरटीओबाबत वापर आहात. ज्या तहसीलदाराने वाळू पकडली, त्या ठिकाणचे फोटो, त्या ठिकाणची एन्ट्री, राज्यमंत्र्यांनी व्हिजिट केलेल्याची नोंद देतो, अहवालाची काॅपी देतो, हे सगळ प्राप्त झाल्यानंतर आपण महसूल राज्यमंत्र्यांना निलंबित करू शकता का? कारण ते लोकसेवेच्या व्याख्यात बसतात, असा प्रश्न आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी उपस्थित केला.
आमच्यावर गुन्हे दाखल केले ना, ते लोकसेवेच्या व्याख्यात बसतात. माझं साधा प्रश्न आहे, ही छोटी चिलटं मारू नका. मारायचा ना मोठा गडी मारा. मला तुमच्या हिंमतीवर विश्वास आहे. मी त्याची दाद देईल. कारण मला माहिती आहे, तुम्ही ताकदवर आहात. या महसूलमंत्र्यांच्या ताकदीचा महाराष्ट्रातील 12 कोटींच्या जनतेला कळू देत की, महसूल राज्यमंत्र्यांची चोरी असेल, तर ती मान्य करणार नाही. सरकारचा कणखरपणा दाखवण्याची ही वेळ, असे अनिल परब यांनी म्हटले.
अनिल परब यांनी थेट शिवसेनेचे महसूल राज्य योगेश कदम यांचे नाव न घेता अनिल परब यांनी घाव घातल्याने सभागृहात एक गोंधळ उडाला. काही काळ गोंधळ सुरूच होता. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी उठून गोंधळ शांत केला. अनिल परबांनी प्रश्न केला आहे, त्याला महसूलमंत्र्यांनाच उत्तर द्यावे लागेल, असे सांगितले.
अनिल परब यांनी थेट पाच प्रकरणाचा दाखला दिल्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची एकप्रकारे कोंडी झाली. मंत्री बावनकुळे यांनी अनिल परब यांनी महत्त्वाचा विधान उपस्थित केले आहे. या प्रकरणांमधील अधिकची माहिती त्यांनी मला द्यावी. मी अधिवेशन संपण्यापूर्वी स्वतः यावर निवेदन करेल, असे आश्वासन दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.