Mumbai News : महाविकास आघाडी सरकार आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका ठाकरे गटाचे खासदार आणि फायरब्रँड नेते संजय राऊत निभावली होती. शिवसेनेतील बंड आणि आघाडी सरकार कोसळल्यानंतर राऊतांच्या टीकेला आणखीच धार चढली. सातत्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू सक्षमपणे लावून धरतानाच ते राज्यातील महायुती सरकारवर चांगलेच ताशेरे ओढतात.पण ठाकरे गटाची हीच तोफ गुरुवारी अडचणीत सापडली होती.
अब्रुनुकसानीच्या खटल्यात न्यायालयाने संजय राऊतांना (Sanjay Raut) 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ही शिक्षा सुनावल्यानंतर काही तासांतच त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे. अशातच राऊतांनी एक सोशल मीडियावर ट्विट करत आपण अशा कारवाईने डगमगणार नसल्याचे संकेत देत आपले इरादे स्पष्ट केले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवडी येथील कोर्टाने संजय राऊतांना 15 दिवसांच्या कारावास आणि 25 हजारांचा दंडही ठोठावला आहे.राऊतांना तत्काळ 15 हजारांचा जामीन मंजूर झाला आहे.तसेच शिवडी न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी निकालाला 30 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे.
अशातच आपल्या आरोपांनंतर मेधा सोमय्यांच्या मनाला वेदना होत असतील तर त्यांचे पती इतरांवर बिनबुडाचे आरोप करताना इतरांना वेदना होत नसतील का असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.न्यायपालिका दबावाखाली काम करत असून सगळ्यांचा हिशोब चुकता केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता.पण त्याचसोबत आता खासदार संजय राऊतांनी आता सोशल मीडियावरील X प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी या पोस्टमध्ये मुश्किलों से से हार जाना आसान होता है, हर पैलू जिंदगी का इम्तिहान होता है, डरनेवालों को नहीं,मिलता कुच्छ जिंदगी में ,और लढनेवालों के कदम मे जहा होता है,जय महाराष्ट्र! असं ट्विट राऊतांनी केलं आहे.या ट्विटमधून संजय राऊतांनी एकप्रकारे विरोधकांना कडक इशाराच दिला असल्याचेही पाहायला मिळत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी येथील कोर्टाने 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मानहानीच्या खटल्यात सुनावण्यात आलेल्या या शिक्षेनंतर राऊत चांगलेच भडकल्याचे दिसते. त्यांनी थेट न्यायव्यवस्थेवर हल्ला चढवला.
संजय राऊतांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडे बोट दाखवले. जिथे सरन्यायाधीशांच्या घरी मोदक खायला पंतप्रधान मोदी जातात, तिथे आम्हाला काय न्याय मिळणार,असेही म्हटले आहे. एकीकडे न्यायालयाचा आपण आदर करत असल्याचे सांगताना त्यांनी न्यायव्यवस्थेचे संघीकरण झाल्याचा गंभीर आरोपही केला.
मला 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी सत्य बोलणं थांबवणार नाही. जनतेच्या पैशाचा अपहार होत आहे, त्यावर आम्ही काही बोलायचे नाही का? आमदार, खासदार, महापालिका सगळ्यांनी तक्रारी केल्या, पण फासावर संजय राऊतांना फासावर लटकवत आहेत, असा आरोप राऊतांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.