Sanjay Raut On Anna Hazare Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut On Anna Hazare : मोदी, शिंदे-फडणवीस सरकारचा भ्रष्टाचार, अण्णा हजारेंनी साधी 'कूस'ही बदलली नाही; खासदार राऊतांची टोलेबाजी

ShivSenaUBT Party MP Sanjay Raut Anna Hazare Ahilyanagar Mumbai : संजय राऊत यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाईवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. अण्णा हजारे सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांवर जास्त टीका करतात, यावरून संजय राऊत यांनी वेगळाच संशय व्यक्त केला.

खासदार संजय राऊत म्हणाले, "अण्णा हजारे यांना महात्मा करण्याचे काम अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि मनीष सिसोदिया यांनी केले. नाहीतर अण्णा हजारेंनी दिल्ली कधी पाहिली असती. रामलीला मैदान, जंतरमंतर रोड कधी पाहिला असता? त्यांनी जो काय आंदोलनाला आवाका दिला, त्यांनतर अण्णा हजारे देशाला माहीत झाले".

अण्णा हजारे नाहीतर ते राळेगणचेच दैवत होते. पाणीप्रश्नावर काम करत होते. शेतीप्रश्नावर काम करत होते. भ्रष्टाचाराच्या (Corruption) लढाईला ज्यांनी तोंड फोडले ते, केजरीवाल आणि सिसोदिया यांनी फोडले. त्याचे प्रतीक अण्णा हजारे होते, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

संजय राऊत यांनी दिल्लीनंतर अण्णांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रात आणि देशात भ्रष्टाचाराचे स्फोट झाले, मोदींचे सरकार असेल, शिंदे-फडणवीस यांचे सरकार असेल, त्यावेळी अण्णा हजारे यांनी राळेगणमध्ये साधी कूस देखील बदलली नाही. हे दुर्दैवानं सांगावे लागतं आहे, अशी टीका केली.

अण्णा हजारे यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करताना, प्रत्येक वेळाला भ्रष्ट सरकारच्या बाजूने उभे राहिले. अण्णा हजारेंकडून लोकांची अपेक्षा नव्हती. आताही अण्णांची भूमिका संशयास्पद आहे. अण्णा हजारे गांधीवादी आहे. गांधींनी जी सत्याची कास धरली, तीच अपेक्षा अण्णांकडून आहे, असेही खासदार संजय राऊत यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT