Sanjay Raut | Chhagan Bhujbal | Manoj Jarange Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : जरांगेंविरोधात पुरेपुर वापर; राऊत म्हणाले, ''अदृश्य शक्तीनं' भुजबळांना आता वाऱ्यावर सोडलं'

Sanjay Raut on Chhagan Bhujbal and Manoj Jarange : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात डावलले गेलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याविषयी संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात ओबीसी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलल्याने ते नाराज आहेत. त्यांनी ही नाराजी जाहीरपणे व्यक्त केली असून, 'जहां नहीं चैना वहां नहीं रहना', अशी भूमिका घेतली आहे.

बंडाचे निशाण फडकवण्याच्या तयारीत भुजबळ दिसत असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला.

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगेंविरोधात ओबीसी (OBC) नेते छगन भुजबळ यांचा पुरेपुर वापर करून घेतला. छगन भुजबळांनी जरांगेंविरोधात टोकाची भूमिका घेतली होती. तशी त्यांनी घ्यायला नको होती. पण अदृश्य शक्तींनी त्यांना ही भूमिका घ्यायला लावली. तसे ते दिसते आहे. आता महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ यांना याच शक्तीने वाऱ्यावर सोडून दिले, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

छगन भुजबळ सध्या या लढ्यात एकाकी पडले आहेत. आता त्यांनी कितीही आदळआपट केली, अश्रू ढाळले तरी त्यांना कोणी विचारणार नाही. आता त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे, असेही शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या मागे हीच अदृश्य शक्ती...

मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना, महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा राहावा, असे आमचे मत होते. पण छगन भुजबळांनी टोकाची भूमिका घेतली. त्यावेळी त्यांच्या मागे अदृश्य शक्ती होती. आता त्याच शक्तीने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. एकनाथ शिंदे यांच्या मागे हीच अदृश्य शक्ती होती. तीच शक्ती भुजबळ यांच्या मागे होती. आता ही शक्ती त्यांच्या मागे नाही. त्यामुळे त्यांचा बळी गेला आहे, असे सध्या तरी दिसते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नाराजांच्या हातात खुळखुळा असेल...

एक-दोन आमदार नाराज झाले, तरी सरकारला काहीच फरक पडत नाही. नाराज असलेले आमदार एक-दोन दिवस लढतील आणि शांत बसतील. त्यानंतर त्यांच्या हातात खुळखुळा दिला जाईल, असा टोला नाराज तानाजी सावंत आणि विजय शिवतारे यांचे नाव न घेता लगावला.

अदृश्य गृहमंत्री लक्ष देणार का?

बीड आणि परभणीसारख्या राज्यातील अनेक भागांमध्ये दंगली उसळल्या असून, तणावाचे वातावरण आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 'अदृश्य गृहमंत्री' तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT