Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या जागी कोणी आणलं जातय का? संजय राऊत कोणते बंद पुस्तक उघडणार

Maharashtra CM Post Speculation Fadnavis Replacement: महायुतीच्या सत्तास्थापनेला होत असलेल्या विलंबावरून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊत यांचा हल्लाबोल.

Pradeep Pendhare

Mumbai News : महायुतीचे सरकार स्थापनेसाठी होत असलेल्या विलंबावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.

"एका गृहमंत्रीपदावरून थांबलेले नाही. सरकार स्थापनेचा हा वादाचा विषय असू शकत नाही. भाजपने अनेक राज्यात सरकार स्थापन केली आहेत. वेगळ काही आहे का? देवेंद्र फडणवीस यांच्या जागी आणलं जात आहे का? त्यासाठी थांबलं आहे का? या सर्व गोष्टींचा उलगडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे नाही, तर आम्ही आमचे बंद पुस्तक उघडू", असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

महायुतीचे (Mahayuti) सरकार स्थापनेला होत असलेल्य दिरंगाईवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. महायुतीकडे बहुमत आहे. "राजभवनात सत्ता स्थापनेचा दावा करायला तयार नाही. राज्यपालाकडून सत्तास्थापनेचे निमंत्रण घ्यायला तयार नाहीत. एका गृहमंत्रीपदावरून हे थांबलेले नाही. भाजपने मनात आणलं की, समोरच्यांना एका मिनिटात चिरडून टाकली. सर्व समोर डरपोक आहेत. ईडी, सीबीआयला घाबरून पळून गेले आहे. निवडणूक आले आहे, ते स्वबळावर निवडून आलेले नाही. जनमताचा पाठिंबा नाही", असे राऊत यांनी म्हटले.

'एका गृहमंत्रीपदावरून हे थांबलेले नाही. हा सरकार स्थापनेचा वादाचा विषय असू शकत नाही. भाजपने अनेक राज्यात सरकार स्थापन केले आहेत. प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून सरकार बनवले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या जागी कोणी आणलं जात आहे का या सर्व गोष्टींचा उलगडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही आमचे पुस्तक उघडू', असा इशारा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे.

त्यांना पोलिसांचे सलाम हवे आहेत

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृहमंत्रीपद का हवे आहे यावर, संजय राऊत म्हणाले, "त्यांना पोलिसांचे सलाम हवे आहेत. पोलिस यंत्रणा वापरून, अनेकांवर खोटे गुन्हे दाखल केलेत, दहशत निर्माण केली आहे. निवडणूक यंत्रणा राबवून घेतली आहे. ही यंत्रणा त्यांच्या हातात पाहिजे". भविष्यात या खात्याचा वापर करून ते भाजपच्या अंगावर देखील जाऊ शकतात. ही त्यांची वृत्ती आहे आणि विकृत्ती सुद्धा आहे, असा देखील टोला राऊत यांनी म्हटले.

...तर सरकार पडले नसते

'गृहखाते हे दुसऱ्या क्रमांकाचे खाते आहे. मुख्यमंत्री आपल्याजवळ गृहखातं ठेवतो. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात तसे केले होते. जेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा करायचो, तेव्हा तेच म्हणायचे उद्धवजींनी गृहखाते दुसऱ्या पक्षाला देण्याची चुक करू नये. आमचे देखील तेच म्हणणे होते. गृहखाते, विधानसभेचे अध्यक्षपद हे संवेदनशील विषय होते. त्यामुळे सरकार पडलं, हे पदं जर आपल्याकडे ठेवले असते, तर सरकार पडले नसते', असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT