Shivsena Politics : तब्बल चारवेळा सत्तेत, चार मुख्यमंत्री पण गृहमंत्रिपदाचा शिवसेनेला चकवा! यंदा काय होणार?

Shivsena Politics Eknath shinde Ministry of Home Affairs : 2019 मध्ये शिवसेना ही भाजपसोबत युतीमध्ये लढली. मात्र, निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात मुख्यमंत्री झाले. या सरकारमध्ये देखील शिवेसेनेकडे गृहमंत्रिपद नव्हते.
Shivsena Politics
Shivsena Politics sarkarnama
Published on
Updated on

Shivsena Politics : महायुतीच्या सरकारची शपथविधी पाच डिसेंबरला होणार आहे. भाजपचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. मात्र,एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. भाजप देखील गृहमंत्रिपद सोडण्यास तयार नाही. महायुतीच्या तीनही नेत्यांची (एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस) यांची बैठक होणार आहे. या बैठकीत खाते वाटपावर निर्णय घेण्या येणार आहे.

शिवसेना 1995 पासून तीन वेळा सत्तेत आली आहे. तर, 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना चौथ्यांदा सत्तेत सहभागी झाली. 1995 पासून मनोहर जोशी, नारायण राणे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद भुषवले. आत्ता पाचव्यांदा शिवसेना सत्तेत सहभागी होणार आहे. मात्र, पहिल्या चारही वेळी शिवसेनाला गृहमंत्रिपदाने हुलकावणी दिली होती.

Shivsena Politics
Mahayuti Oath Ceremony : भाजपने शपथविधीसाठी शिवाजी पार्क वगळून आझाद मैदान का निवडले? 'हे' आहे कारण

1995 ला युतीचे पहिल्यांदा युतीचे सरकार सत्तेत आले. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री तर भाजपचे गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले. या सरकारमध्ये गृहमंत्रीपद हे गोपीनाथ मुंडेंकडे होते. 2014 मध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले. मात्र, सत्तेस्थापनेसाठी दोघे एकत्र आले. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. गृहमंत्रिपद देखील त्यांच्याकडे होते. या सरकारमध्ये शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देखील मिळाले नाही.

2019 मध्ये शिवसेना ही भाजपसोबत युतीमध्ये लढली. मात्र, निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात मुख्यमंत्री झाले. या सरकारमध्ये देखील शिवेसेनेकडे मुख्यमंत्रिपद असले तरी गृहमंत्रिपद नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याकडे गृहमंत्रिपद होते.

शिवसेनेमध्ये फूट पडून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. अवघे 40 आमदार असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. नंतर या सरकारमध्ये सहभागी होत अजित पवार हे देखील उपमुख्यमंत्री झाले. महायुतीच्या या सरकारमध्ये गृहमंत्रिपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होते.

यंदा काय होणार?

1995 पासून शिवसेनेचे चार मुख्यमंत्री झाले. मात्र, या चारही मुख्यमंत्र्यांच्या काळात तसेच 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देखील शिवसेनेला गृहमंत्रिपद मिळाले नव्हते. या पद आपल्याकडे ठेवण्यास शिवसेनेला नेहमीच अपयश आले आहे.

Shivsena Politics
Ambadas Danve News : 'कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती', पराभवाने खचू नका!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com