Sanjay Raut  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : बिनखात्याचे सरकार, भुजबळांचा जातीय राजकरणातून बळी, इथंच कर्माची फळ; राऊतांची महायुती सरकारला डिवचलं

Sanjay Raut Criticize Mahayuti Government : महायुती सरकार म्हणजे, बिनखात्याचे सरकार असून, विरोधक ताकदीने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर सरकारला जाब विचारतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Pradeep Pendhare

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महायुती सरकारच्या शपथविधीवर टीका केली. बिनखात्याचे सरकार, असा उल्लेख करत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळण्यामागे जातीय राजकारण असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

तसंच अधिवेशनाला समोरे जाताना विरोधी पक्षनेता नसला, तरी दोन्ही सभागृहात ताकदीचे विरोधक असल्याचा दावा, संजय राऊतांनी केला.

संजय राऊत म्हणाले, "मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. अजून खाते वाटलेली नाही. यातच अधिवेशन होत आहे.हे बिनखात्याचे सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे कोणते खाते हे समजत नाही.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणते खाते असणार आहे, महसूल आहे की, अमसूल आहे कळायला मार्ग नाही. अजितदादांकडे त्यांचे नियमित खाते आहे का? ते कळायला मार्ग नाही:. तब्बल एक महिना झाला, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार नाही.

सर्व खात्यांचे प्रश्नाला उत्तर देवेंद्र फडणवीस देणार आहेत. तशा सचिवांना सूचना आहेत का?, असे मुद्दे उपस्थित करत महायुती सरकारवर टीका केली.

नागपूरमध्ये अधिवेशनाला समोरे जाताना विरोधी पक्षनेता नाही, यावर संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. हत्या, खून होत आहे. परभणीमध्ये पोलिस कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणावर गंभीर आहे. यातून आंबेडकर अनुयायी यांनी परभणी, महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे". यावर विरोधक सरकारला जाब विचारतील. दोन्ही सभागृहात विरोधक ताकदीचे आहेत. ते प्रश्न विचारतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

भुजबळांना डावलले, कर्माची फळ पाहतो आहे

महायुती सरकारमध्ये अनेक ताकदवान नेत्यांना मंत्रीपद मिळालेले नाही, यावर बोलताना संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांना वगळण्यामागे जातीय राजकारण आहे. छगन भुजबळांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडली. ज्यांना त्यांना कर्माची फळ मिळतात. हे आम्ही पाहत आहोत, असा टोला लगावला. तसेच महायुतीमध्ये अडीच वर्षांच्या फॉर्म्युलावरही राऊतांनी टीका. मंत्रिपदाचा फॉर्म्युला सहा-सहा महिन्यांचा हवा होता. तसे केल्यास सर्वांना मंत्रि‍पदावर संधी मिळेल, असा टोला संजय राऊतांनी लगावाला.

फडणवीस ताकदीचे भ्रष्टाचारी घेऊन बसलेत

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी भ्रष्टाचाराबाबत 'झिरो टॉलरेंस' राबवणार, असे म्हटले होते. तेच देवेंद्र फडणवीस देखील म्हणत होते. परंतु फडणवीस यांनी त्यांच्या सरकारमध्ये सर्व ताकदीचे भ्रष्टाचारी आवतीभोवती घेऊन बसले आहे. जसे देशात नरेंद्र आवतीभोवती भ्रष्टाचारी घेऊन बसले आहेत", असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

फडणवीस आजही स्वतःला गृहमंत्री समजतात

"परभणीतील संतोष सूर्यवंशी यांच्या मृत्यूची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे. फडणवीस आजही स्वतःला गृहमंत्री समजतात. संविधान वाचवण्यासाठी सूर्यवंशी यांनी संघर्ष केला. राज्यात संविधानविरोधी सरकार आले आहे. संविधानावर हल्ला झाला होता. या हल्ल्यापासून संविधानाला वाचवण्यासाठी आंबेडकर अनुयायी संघर्ष केला", असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT