Maharashtra cabinet expansion : 'टीम देवेंद्र'मध्ये परभणीच्या मेघना बोर्डीकर! आता जिल्ह्याचे पालकत्वही मिळणार?

After ten years, Parbhani gets ministerial post :जिल्ह्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. मेघना बोर्डीकर यांनी आपले वडील जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात पाऊल ठेवले.
Mla Meghna Bordikar News
Mla Meghna Bordikar NewsSarkarnama
Published on
Updated on

गणेश पांडे

परभणी : अपेक्षे प्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांचा समावेश करण्यात आला आहे. आता आपला जिल्हा आपलाच पालकमंत्री या प्रमाणे जिल्ह्याचे पालकत्व मेघना बोर्डीकर यांना मिळणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मराठवाड्यातील राजकीय इतिहासात परभणी जिल्हा कायमच पिछाडीवर राहिला आहे. परंतु दहा वर्षानंतर का होईना जिल्ह्याला आमदार मेघना बोर्डीकर यांच्या राज्यमंत्रीपदामुळे नवी ओळख मिळणार आहे.

परभणीच्या राजकीय आणि सामाजिक विकासाला यामुळे नवा आयाम मिळणार असल्याचे बोलले जात आहे. (Parbhani) परभणी जिल्हा बराच काळ मंत्रिपदापासून वंचित राहिला होता. मात्र, मेघना बोर्डीकर यांच्या रुपाने परभणीला पुन्हा एकदा राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. त्या जिल्ह्याच्या दुसऱ्या महिला राज्यमंत्री ठरल्या आहेत. याआधी परभणी जिल्ह्यातून महिलांना राजकीय संधी मर्यादित स्वरूपात मिळायची. माजी मंत्री फौजिया खान यांच्यानंतर आता मेघना बोर्डीकर यांची राज्यमंत्रीपदावर वर्णी लागली आहे.

Mla Meghna Bordikar News
Parbhani Political News : 'देवाभाऊं'च्या दरबारात परभणीचा मंत्री दिसणार का?

जिल्ह्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. मेघना बोर्डीकर यांनी आपले वडील जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात पाऊल ठेवले. 2011 मध्ये राजकारणात प्रवेश करत त्यांनी खऱ्या अर्थाने कामाला सुरवात केली. 2012 मध्ये परभणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी राजकारणातील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. सुरुवातीला काँग्रेस पक्षात काम करणाऱ्या बोर्डीकर यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याच वर्षी जिंतूर विधानसभा मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक लढवून विजय मिळवला.

Mla Meghna Bordikar News
BJP cabinet expansion : भाजप 'शिवीगाळ अन् अर्वाच्च भाषा' नावाचे मंत्रालय स्थापन करणार; अतुल लोंढेंचा नेमका कोणाला टोला?

भाजपच्या धोरणानुसार त्यांनी शिवसेना-भाजप युती धर्माचे पालन करत लोकसभा निवडणुकीत संजय जाधव यांना पाठींबा दिला. याच काळात त्यांच्या कामाच्या शैलीमुळे त्यांचा प्रभाव वाढत गेला. जिंतूर आणि सेलू तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी भरीव योगदान दिले. यामुळे त्या अभ्यासू आमदार म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मेघना बोर्डीकर यांच्या मंत्रिपदामुळे परभणी जिल्ह्याचा रखडलेला विकास मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा आहे.

Mla Meghna Bordikar News
Mahayuti Cabinet : महायुतीच्या 39 आमदारांना मंत्रिमंडळात संधी; हे आहेत कॅबिनेट अन्‌ राज्यमंत्री!

मेघना बोर्डीकर यांना मिळालेल्या राज्यमंत्रीपदामुळे परभणी जिल्हा पुन्हा मराठवाड्याच्या राजकीय नकाशावर अधोरेखित झाला आहे. त्यांच्या कार्यकौशल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा परभणीकर बाळगून आहेत. परभणी जिल्ह्यासाठी दही वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आशेचा किरण दिसू लागला आहे. जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली. त्यांच्या या नेमणुकीनंतर परभणीसाठी पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता अधिक बळावली आहे. जिल्ह्याच्या रखडलेल्या पायाभूत सुविधांपासून सामाजिक आणि औद्योगिक विकासाच्या कामांना यातून गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com