Uday Samant And Vinayak Raut Sarkarnama
मुंबई

Uday Samant And Vinayak Raut : उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, शिंदेंना भाजपने पर्याय शोधलाय; विनायक राऊत यांचा गौप्यस्फोट

ShivSenaUBT party Vinayak Raut Eknath Shinde ShivSena Konkan Minister Uday Samant Deputy Chief Minister Mahayuti government : शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांना महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हायचा असल्याचा खळबळजनक दावा विनायक राऊत यांनी केला.

Pradeep Pendhare

Mumbai News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांच्यामार्फत राज्यात 'ऑपरेशन टायगर' जोरात सुरू आहे. त्यामुळे उदय सामंत चर्चेत आहेत.

उदय सामंत यांच्या या फोडाफोडीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते विनायक राऊत चांगलेच भडकले असून मोठा गौप्यस्फोट केला आहे. उदय सामंत खूप महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं आहे. भाजपने देखील महायुतीत शिंदेंना पर्याय शोधला असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला.

राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे 'ऑपरेशन टायगर' सुरू आहे. यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना खिळखिळी झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील इनकमिंग वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसमधील कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश सुरू आहेत.

कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे एकमेव आमदार भास्कर जाधव देखील नाराज आहेत. त्यांचे चुलत बंधू यांनी शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) उद्या प्रवेश निश्चित केला आहे. भास्कर जाधव शिवसेनेत आल्यास त्यांचे स्वागत करू. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास आवडेल, असेही उदय सामंत यांनी म्हटले आहे.

भास्कर जाधव नाराज...

उदय सामंत यांच्या या प्रतिक्रियेवर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देत, सामंत यांनी दाखवलेल्या आदराने बरं वाटलं. असाच सन्मान राहू द्या, असे म्हटले आहे. याशिवाय क्षमता असून देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षात संघटनेचे प्रदेश पातळीवर काम करण्यास संधी मिळत नसल्याची खंत बोलावून दाखवली.

खासदार राऊत म्हणाले...

शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भास्कर जाधव यांच्याशी कालपासून चर्चा सुरू आहे. आजही देखील त्यांच्याशी चर्चा होणार आहे. तसेच पक्षातील नाराजींचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेणार असल्याचे म्हटले आहे. यातच शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी या फोडाफोडीच्या राजकारणावर टीकास्त्र सोडले आहे.

विनायक राऊत काय म्हणाले...

विनायक राऊत म्हणाले, "उदय सामंत यांचा धंदाच सुरू आहे. उदय सामंत स्वतःच्या माध्यमातून लोकं जमा करायचे अन् उद्या एकनाथ शिंदे यांच्यासमोर पर्याय ठेवायचा. उपमुख्यमंत्रीपद स्वतःच्या पदरात पाडून घ्यायचे, हा चाललेला धंदा आहे. ते महत्त्वाकांक्षी विचारी आहेत. ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. यापूर्वीच्या अनुभवातून ते आमच्या लक्षात आलेले आहे". महायुतीत एकनाथ शिंदेनाही भाजपने पर्याय शोधला आहे, असाही खळबळजनक दावा विनायक राऊत यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT