st Department scam .jpg Sarkarnama
मुंबई

ST Mahamandal 2000 Crore scam: धक्कादायक! एसटी महामंडळात तब्बल 2 हजार कोटींचा घोटाळा? सीएम फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

CM Devendra Fadnavis Orders Investigation : राज्य परिवहन मंडळ म्हणजेच एसटी बसच्या खात्यात तब्बल 2000 कोटींचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घोटाळा प्रकरणात आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्याचे दिसून येत आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर एकीकडे बीड,परभणी येथील घटनांवरुन विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार हल्ले चढवले जात आहे.मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासह, कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उचलून धरत मुख्यमंत्रीपदासह गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांवर (CM Devendra Fadnavis) टीकेचे बाण सोडले जात आहे. अशातच आता एसटी महामंडळातील तब्बल 2000 हजार कोटींचा मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

राज्य परिवहन मंडळ म्हणजेच एसटी बसच्या (ST Bus Department) खात्यात तब्बल 2000 कोटींचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घोटाळा प्रकरणात आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्याचे दिसून येत आहे.

एसटी महामंडळाने 1310 एसटी बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय सरकारला अंधारात ठेवून घेतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हा निर्णय आता वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. एसटी महामंडळाकडून कंत्राटदारावर खास मेहेरबानी दाखवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला तब्बल 2000 हजार कोटींचा आर्थिक फटका बसला असल्याची खळबळजनक बाब समोर येत आहे.

आता या घोटाळ्याप्रकरणी (SCAM) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. भाडेतत्वावरील बस सेवेत घेण्याच्या निर्णयाला फडणवीसांनी स्थगिती दिली आहे. तसेच या निर्णयाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून पुढील काही दिवसांत पुन्हा एसटी महामंडळातील या घोटाळा उचलून धरत राजकीय वातावरण तापवले जाण्याची शक्यता आहे.

एसटी परिवहन महामंडळाच्या अप्पर सचिवांमार्फत या घोटाळ्याचे चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. 2022मध्ये 44 रुपये किलोमीटर प्रतिदराने 500 एसटी बसेस भाडेतत्वावर घेण्यात आल्या होत्या. निविदेत डिझेल खर्च वगळून 39 ते 41 रुपये प्रति किलोमीटर दर तर तडजोडीनंतर डिझेल खर्च वगळून 34.30 आणि 35.40असा दर निश्चित करण्यात आला होता.

तर डिझेल खर्च प्रति किलोमीटर 20 ते 22 रुपये असल्याने एसटीवर भार येत होता.मागच्या निविदेच्या तुलनेत प्रतिकिलोमीटर 12 रुपये अधिकचा भार एसटीवर येत असल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT