Shivsena Ubt News : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का ! गंभीर आरोप करत, ठाकरेंच्या शिलेदारांनी पक्षाला केला जय महाराष्ट्र

Vishal Dhnwade News : शिवसेना नेते विशाल धनवडे यांनी मीडियावरती पोस्ट करत शिवसेना पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले.
devendra fadnavis and leader
devendra fadnavis and leader Sarkarnama
Published on
Updated on

Pune Politics News : पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर केले आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी गंभीर आरोप करत पक्ष सोडला असून लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यासोबतच बाळा ओसवाल यांनी देखील याबाबतची पोस्ट केली आहे. त्यांच्यासोबत इतर पाच माजी नगरसेवक देखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पुण्यातील आणि पिंपरी चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मात्र, या बैठकीला एकही माजी नगरसेवक उपस्थित राहिला नव्हता. त्यामुळे अंतर्गत नाराजी समोर आली होती. यावेळी 'सरकारनामा'ने लवकरच पुण्यातील ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्याची बातमी दिली होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे.

devendra fadnavis and leader
Dhananjay Munde News : नि:पक्षपणे चौकशीसाठी धनंजय मुंडेंना मंत्रीपदापासून दूर ठेवा; खंडपीठात याचिका!

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भेट घेतली होती. त्यानंतर हे माजी नगरसेवक भाजपमध्ये (BJP) लवकरच प्रवेश करतील, असे सांगण्यात येत होते मात्र प्रवेशाची तारीख निश्चित ठरली नव्हती. मात्र आता विशाल धनवडे यांनी पक्ष सोडला असल्याचे जाहीर केले आहे. विशाल धनवडे यांच्यासोबत माजी नगरसेवक बाळा ओसवाल यांनी देखील पक्ष सोडला असल्याचे जाहीर केले आहे. काय म्हणाले फेसबुक पोस्टमध्ये विशाल धनावडे सप्रेम जय महाराष्ट्र, आजच्या या पत्रास कारण की या नवीन वर्षात मी एक निर्णय घेतला आहे आणि या निर्णयात आपली भूमिका महत्वाची आहे. विशाल धनवडे , बाळा ओसवाल यांच्यासोबतच संगीता ठोसर, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट हे माजी नगरसेवक भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे.

devendra fadnavis and leader
Abdul Sattar News : शिवसेना नव्हे, 'सत्तारसेना' ; शक्तीप्रदर्शनातून देणार संदेश!

काही निर्णय घेताना त्रास होतो तसा मला ही झाला आहे. मागील एक महिन्यापासून झोप नाही, प्रेशर मुळे बीपीची गोळी चालू झाली. परंतु आता निर्णय झाला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे म्हणतात तसे एकदा निर्णय घेतला की, घेतला परत मागे नाही फिरायचे तसे झाले आहे. मी कधी माझ्या स्वप्नात ही विचार केला नाही की माझी शिवसेना (Shivsena) मला सोडावी लागेल. ज्या शिवसेनेवर मी एवढं प्रेम केले, ती वाढवण्यासाठी एवढे कष्ट घेतले, ज्या शिवसेनेने मला एवढे प्रेम दिले, नाव दिले, मोठे केले. ती शिवसेना सोडताना खूप त्रास होतो आहे परंतु शिवसेना का सोडतोय ? याला खूप कारणे आहेत. परंतु जाताना कोणाला ही नाव ठेवून जायचे नाही यामध्ये माझी शिवसेना, माझे उद्धव साहेब, आदित्य साहेब यांच्या बद्दल मला खूप आदर आणि प्रेम आहे. त्यांच्या बद्दल कोणतीही तक्रार नाही.

devendra fadnavis and leader
Santosh Deshmukh Case : तपास चक्र फिरली! वाल्मिक कराड नंतर आता CID च्या रडारवर सुदर्शन घुले

पुण्यातील शिवसेनेला कोणीही वाली नाही येथे जिल्ह्यात पक्षालाच शिवसेना नको आहे, असे वाटायला लागले आणि यातूनच घुसमट चालू झाली. ना पुण्यात लोकसभेला जागा, ना ही विधानसभेला. आणि जागा मिळाली तरीही त्या उमेदवाराच्या मागे कोणतीही ताकद द्यायची नाही. कोणतीही रसद पुरवायची नाही. ना कोणत्या शिवसैनिकाला कसलीही मदत करायची नाही ना कोणत्या शिवसैनिकांच्या सुख दुःखात सहभागी व्हायचे नाही. पुण्यात शिवसेनेला कोणीही वाली नाही. ज्यांच्यात शिवसेना वाढवण्यासाठी काम करण्याची भूक आहे त्याला काम करू न देणे हे मागील 5 वर्षे झाले चालू आहे, पक्षातील जे नगरसेवक आहे ते वाढवायचे सोडून जे आहेत त्यांच्याच पायात पाय घालण्याचे काम सुरू आहे.

devendra fadnavis and leader
Santosh Deshmukh Murder : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची आव्हाडांना अपेक्षा अन्‌ फडणवीसांचे रोखठोक उत्तर! (Video)

संपर्क प्रमुखांच्या कानावर यासर्व गोष्टी असून सुद्धा ते काहीही करू शकले नाहीत, असे म्हण्यापेक्षा त्यांच्या हातात काहीही नव्हते असे आहे. जे काहीही करू शकत नाही, असे लोक संघटना चालवतं आहेत, ज्यांचे खरे काम बॅक ऑफिस सांभाळणे आहे. त्यांना पक्ष सांभाळायला दिला आहे. पक्षात मागील 5 वर्षात पक्ष वाढवण्यासाठी एकही बैठक झाली नाही की त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. असो अशी बरीच कारणे आहे परंतु आता कोणतीही कारणे न देता मी भाजपमध्ये प्रवेश करतो आहे. पुढील काळात प्रभागासाठी आणि शहरासाठी खूप काही करायचे आहे, नक्कीच जे करू ते चांगले करू, असा विश्वास आहे यामध्ये तुमची साथ मोलाची आणि महत्वाची आहे. आपणास नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. अशी पोस्ट विशाल धनवडे यांनी फेसबुकवर केली आहे.

devendra fadnavis and leader
Bharat Gogawale Video : तपश्चर्या फळाला आली, मीच रायगडचा पालकमंत्री! गोगावलेंनी ठणकावून सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com