Walmik karad : मास्क लावून झोपला, अर्धी पोळी खाल्ली..., वाल्मिक कराडचा जेलमधला दिनक्रम कसा?

How Was walmik karad First Day in Jail : वाल्मिक कराडने सरेंडर केल्या नंतर सीआयडीने त्याला केज पोलिसांच्या स्वाधीन केले. वैद्यकीय पथकाने कराडची आरोग्य तपासणी केली.
Walmik karad
Walmik karadsarkarnama
Published on
Updated on

Walmik karad News: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड तब्बल 21 दिवस फरार होता. त्यामुळे त्याला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी सीआयडीकडे दिल्याने सीआयडीकडून वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरु होती. त्याच दरम्यान, 31 डिसेंबरला वाल्मिक कराडने पुण्यात सीआयडीसमोर सरेंडर केले.

कराड याच्या सरेंडरनंतर सीआयडीने त्याला केज पोलिसांच्या स्वाधीन केले. वैद्यकीय पथकाने कराडची आरोग्य तपासणी केली. केज पोलिसांनी त्याला रात्री उशीरा न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी न्यायालयाने 14 दिवसांची न्याायलयीन कोठडी सुनावली. मध्यरात्री 1.45 कराड याची रवानगी कोठडीमध्ये करण्यात आली.

Walmik karad
Koregaon Bhima Shaurya Din : "जनतेच्या मतावर निवडून आले..."; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री कोरेगाव-भीमाला न आल्याने आंबेडकरांची नाराजी

तुरुंगात आणल्यानंतर कराड याचा दिनक्रम कसा होता? याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोठडीत रवानगी होताच रात्री डाॅक्टरांनी कराड याची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर रात्रभर कराड ऑक्सिजन मास्क लावून झोपल्याची माहिती आहे.

बुधवारी (ता.1) कराडच्या दिवसाची सुरुवात 8 वाजता झाली. साडेआठ वाजता त्याला चहा देण्यात आला. मात्र, चहा घेण्यास त्याने नकार दिला. 11.45 च्या दरम्यान त्याला जेवण देण्यात आले. मात्र, त्याने केवळी अर्धी पोळी खाल्ली तसेच सायंकाळी चार वाजता थोडा भात खाऊ असे सांगितले.

कोठडी संपल्यानंतर काय?

कराड याला न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. या कोठडी दरम्यान पोलिस संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याच्याकडे चौकशी करण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणात आणखी काय पुरावे मिळत आहेत का हे पाहातील. 14 दिवसांची कोठडी संपल्यानंतर पुन्हा त्याला न्यायलयात हजर केले जाईल. त्यावेळी सरकारी वकीलांकडून आणखी कोठडी वाढवून देण्याची मागणी करण्यात येण्याची शक्यता आहे. तर कराडचे वकील जामीनासाठी प्रयत्न करतील.

Walmik karad
Ramdas Athawale Koregaon Bhima : 200 एकर जमीन 200 कोटींचा निधी, कोरेगाव भीमासाठी आठवलेंच्या मनात काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com