मुंबई : सत्तास्थापनेनंतरच्या संघर्षात पडद्याआडून सूत्रे फिरवणारे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे आता चांगलेच 'अॅक्शन मोड'आले आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंपाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनाही त्यांनी आव्हान देत, 'पिक्चर अभी बाकी हैं', अशा शब्दांत इशारा दिला आहे.
यावर महाविकास आघा़डीच्या नेत्यांकडूनही प्रतिक्रिया आली असून सत्ता आली म्हणून हुलग्यासारखं पेरणीच्या दांडीत उगवू नका, अजितदादा यांच्यावर बोलण्याअगोदर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सल्ला घ्या,अशा शब्दात सचिन रिपाई (खरात) चे अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी श्रीकांत शिंदेंना प्रत्युत्तर दिले आहे. (Shrikant Shinde, Sachin Kharat Latest News)
सचिन खरात म्हणाले, "श्रीकांत शिंदे सुप्रीम कोर्टाचा निकाल लागायचा आहे. इतक्यात हुलग्यासारखं पेरणीच्या दांडीत उगवू नका. अजितदादांवर टीका करताना म्हणाले हा पहाटेचा फ्लॉप शो नाही परंतु मुख्यमंत्री शिंदे यांच पान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशिवाय हालत नाही. फडणवीसांना विचारा अजितदादांचा फ्लॉप शो झाला की भाजपाचा फ्लॉप शो अजितदादांनी केला. तुम्ही म्हणता फ्लॉप शो नाही 'शोले' आहे. पण तुमची अवस्था शोले मधील आसराणी सारखी एक दिवस होणार असून अर्धे इकडे आणि अर्धे तिकडे आणि तुम्ही एकटेच रहाल, असा टोलाही त्यांनी खासदार शिंदेंना लगावला.
पुढे ते म्हणाले, तुमच्याच जिल्ह्यात आदिवासी महिलांची रस्त्यावर डिलिव्हरी होऊ लागली, शाळेची मुलं डोक्याइतक्या पाण्यातून शाळेत जाऊ लागली, दलित समाजावर बहिष्कार टाकायला लागली आहेत. त्यामुळे खरंच धडकी भरली आहे, खरंच फिचर अभी बाकी आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. त्यामुळे आपण अजित पवार यांच्यावर बोलण्याअगोदर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला घ्यावा, असा खोचक टोला लगावला आहे.
दरम्यान खासदार शिंदेंनी ट्विट करत "दादा हा 'शो' नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो' सारखा...हा 'शो'ले आहे, एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा !आणि हो ....हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या 'ट्रेलर' नेच धडकी भरली ?पिक्चर अभी बाकी है' !!!, असे ट्विट करत शिंदेनी अजित पवार यांना डिवचलं होत. मात्र यावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या रिपाईच्या खरातांनी खासदार शिंदेंना प्रत्युत्तर दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.