Siddhivinayak Temple Audit | Donation Audit | Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Siddhivinayak Temple : एकनाथ शिंदेंकडून सिद्धीविनायक मंदिराच्या ऑडिटचे आदेश : ठाकरेंच्या काळातील सगळ्या कारभाराची होणार चौकशी

Siddhivinayak Temple Donation Audit : मंगळवारी (४ ऑगस्ट) श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिंदे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांना विशेष ऑडिट करण्याचे निर्देश दिले.

Jagdish Patil

Siddhivinayak Temple Audit : मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिरात गेल्या पाच वर्षांत प्राप्त झालेल्या रोख देणग्या, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

या ऑडिटमध्ये मंदिरातील आर्थिक व्यवहार, देणग्यांची नोंद आणि त्यांच्या व्यवस्थापनाची सखोल तपासणी केली जाणार आहे. या निर्णयामुळे माजी अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या कार्यकाळातील आर्थिक व्यवहारांचाही आढावा घेतला जाणार आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष म्हणून आदेश बांदेकर यांनी नोव्हेंबर २०२३ पर्यंत जबाबदारी सांभाळली होती.

त्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सदा सरवणकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे गेल्या पाच वर्षांचा कालावधी तपासणीच्या कक्षेत येत असल्याने बांदेकर यांच्या कार्यकाळातील देणग्या, दागिन्यांची नोंद आणि आर्थिक व्यवहारांचीदेखील पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी दिलेल्या या आदेशामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना अडचणीत येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मंगळवारी (४ ऑगस्ट) श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिंदे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांना विशेष ऑडिट करण्याचे निर्देश दिले. या चौकशीत मंदिरात आलेल्या रोख देणग्या, सोन्या-चांदीचे दागिने, इतर मौल्यवान वस्तू, त्यांची नोंद, साठवणूक, आर्थिक व्यवहार तसेच व्यवस्थापनाची सविस्तर तपासणी केली जाणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, विशेष ऑडिटमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. या चौकशीमुळे मंदिराच्या आर्थिक व्यवहारांबाबत अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT