Vaishali Nagawade : सुनेत्रा पवारांनी शोधल्या रुपाली चाकणकरांच्या उत्तराधिकारी : वैशाली नागवडे यांच्याकडे राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी

Vaishali Nagawade NCP Women President: रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेध्याक्षपदी अखेर वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Vaishali Nagawade to Lead NCP Women's Wing in Maharashtra
Vaishali Nagawade to Lead NCP Women's Wing in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Vaishali Nagawade NCP appointment: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अखेर रुपाली चाकणकरांना उत्तराधिकारी शोधला आहे. चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी स्पर्धा होती. अनेक महिला नेत्यांनी हे पद आपल्याला मिळावे, म्हणून सुनेत्रा पवारांना साकडे घातले होते.मात्र, अखेर त्यांनी वैशाली नागवडे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची नियुक्ती केली.

अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदासह महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे मार्च महिन्यापासून ही दोन्ही पदे रिक्त होती. अखेर प्रदेशाध्यक्षपदी नायवडे यांची नियुक्ती करण्यात आली.

१९९९ मध्ये कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या कामानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी नागवडे कुटुंबीयांची परिचय झाला. त्यानंतर वैशाली नलावडे यांची २००२ मध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली.

२००५ मध्ये महानंदाच्या संचालिका ,२००७ मध्ये पंचायत समिती दौंडच्या सदस्यपदी, २००९ मध्ये राष्ट्रवादी पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा ,याच वर्षी महाराष्ट्र पंचायत राज महिला समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. २०१० मध्ये दुसऱ्यांदा महानंदाच्या संचालकपदी निवड झाली व २०१३ मध्ये राज्याच्या महानंदाच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. याच वर्षी IVRI - बरेली , उत्तर प्रदेश या संस्थेच्या डायरेक्टर झाल्या.

Vaishali Nagawade to Lead NCP Women's Wing in Maharashtra
Rupali Chakankar : सुनेत्रा पवारांसाठी रूपाली चाकणकर मैदानात; काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हणाल्या, "दादांच्या पश्चात..."

चाकणकारांच्या विरोधात भूमिका

वैशाली नागवडे या मुळच्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील आहेत, सध्या पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्षपद आणि प्रदेश सरचिटणीसपद भूषवले आहे.

पक्षाचा महिला आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. २०१७ आणि २०२० मध्ये पक्षाकडून त्यांनी राहू-खामगावमधून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. त्यांना अजित पवार यांना महानंदा दूधच्या चेअरमन पदाची धुरा देखील सोपवली होतीच पक्षात रुपाली चाकणकर यांच्या विरोधात अनेक वेळा भूमिका घेतल्याने त्या चर्चेत होत्या.

Vaishali Nagawade to Lead NCP Women's Wing in Maharashtra
Nashik Mahanagarpalika : शिंदे गटाच्या नगरसेवकाला मोठा धक्का! आधी नगरसेवकपद गेलं, आता थेट पोलिसांत गुन्हा दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com