Rupali Chakankar : सुनेत्रा पवारांसाठी रूपाली चाकणकर मैदानात; काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हणाल्या, "दादांच्या पश्चात..."

Rupali Chakankar on Congress Controversy : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर टीका करताना वापरलेल्या ‘गुंगी गुडीया’ या शब्दावर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांकडून जोरदार प्रतिउत्तर दिले जात आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर देखील आता मैदानात उतरल्या आहेत.
Rupali Chakankar, Sunetra pawar
Rupali Chakankar, Sunetra pawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 05 Aug : बीडमधील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटला असून, त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला मंत्री धनंजय मुंडे यांनी रोखल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली.

मात्र, यावरून उपमुख्यमंत्र्यांवर टीका करताना वापरलेल्या ‘गुंगी गुडीया’ या शब्दावर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांकडून जोरदार प्रतिउत्तर दिले जात आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर देखील आता मैदानात उतरल्या आहेत.

नेमका वाद काय?

बीडमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत पत्रकाराने प्रश्न विचारला असता मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना बोलण्यापासून रोखल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने व्हिडिओ शेअर करत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. धनंजय मुंडे बीडचे हुकूमशहा आहेत का? असा सवाल करत काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

Rupali Chakankar, Sunetra pawar
Sunetra Pawar : 'गूँगी गुडिया' म्हणणाऱ्या काँग्रेसला सुनेत्रा पवारांचा इशारा; पाच शब्दातच विषय संपवला, म्हणाल्या...

याच वादात काँग्रेसने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरही टीका केली. सुनेत्रा पवार यांचा उल्लेख ‘गूँगी गुडीया’ असा करत, त्या अजून किती दिवस गूँगी गुडीया बनून राहणार? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला. या संपूर्ण प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत सोशल मीडिया पोस्टद्वारे रूपाली चाकणकर म्हणाल्या, "विचारांचा पराभव झाला की काँग्रेस महिलांचा अपमान करते, हीच त्यांची खरी ओळख.

आदरणीय दादांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा वहिनींची खिल्ली उडवणं यातुन, काँग्रेसच्या विकृत मानसिकतेचे दर्शन होत आहे. काँग्रेसने आपल्या या वक्तव्याबद्दल माफी मागावी. महिलांचा सन्मान ही महाराष्ट्राची परंपरा आहे. दुर्दैवाने आज स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या काँग्रेसनेच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी यांच्याविषयी वापरलेली भाषा ही अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे.

Rupali Chakankar, Sunetra pawar
Beed Politics : बीडमध्ये सत्ता बदलाचे वारे : 'क्षीरसागरांच्या' हालचालींवर पंडित 'सायलेंट'; चव्हाणांची डॅमेज कंट्रोलसाठी धडपड

अजितदादांच्या पश्चात अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी जबाबदारी स्वीकारली, वैयक्तिक दुःखावर मात करत जनतेच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित केले. अशा एका महिलेचा सन्मान करण्याऐवजी तिचा अपमान करण्याची काँग्रेसची मानसिकता महाराष्ट्र कधीच स्वीकारणार नाही.

एखाद्या महिलेच्या कर्तृत्वाला उत्तर देता येत नसेल, तर तिच्यावर वैयक्तिक टीका करून तिचा अवमान करणे ही काँग्रेसची राजकीय संस्कृती आहे का? महिलांच्या सन्मानाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी आज स्वतःच आपला खरा चेहरा महाराष्ट्रासमोर उघड केला आहे.' अशा शब्दात चाकणकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. तर काँग्रेसच्या या टीकेमुळे आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक नेते मैदानात उतरले असून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com