Nitesh Rane-Disha Salian-Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Nitesh Rane : ...तर मी आदित्य ठाकरेंची माफी मागायला तयार; नीतेश राणे असं का म्हणाले?

Disha Salian death case : संभाजीनगरमध्ये आज आमचे भाजप पदाधिकारी हे लोकांच्या मनातील प्रश्न विचारायला तिथे गेले होते. पण, त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी पळ काढण्यापेक्षा बाहेर येऊन दिशा सालियान प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, हे सांगायला पाहिजे होते.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 26 August : दिशा सालियान हिचा मृत्यू झाला, त्या ठिकाणी उपस्थित नसल्याचा पुरावा आदित्य ठाकरे यांनी दिला तर मी त्यांची माफी मागायला तयार आहे. आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन आणि सुशांतसिह याच्याबद्दल का विचारतात, असा सवाल आमदार नीतेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) थांबलेल्या हॉटेलबाहेर भाजप आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला. त्यानंतर आमदार राणे यांनी माध्यमांशी बोलताना दिशा सालियान प्रकरणावरून पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, आज सकाळी ठाकरे गटातील आदित्य ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) या दोन नेत्यांची वक्तव्ये ऐकली. हे दोघेही महिला अत्याचार आणि विकृतीवर बोलत होते. पान त्यांचे चारित्र्य पाहिलं तर त्यांनी फक्त यात डॉक्टरकी मिळवायचीच बाकी आहे.

संभाजीनगरमध्ये आज सकाळी झालेलं आंदोलन, हे कोणी पक्षाने केलेला नव्हतं. पण, आमचे भाजप पदाधिकारी हे लोकांच्या मनातील प्रश्न विचारायला तिथे गेले होते. पण, त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी पळ काढण्यापेक्षा बाहेर येऊन दिशा सालियान प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, हे सांगायला पाहिजे होते. त्या ठिकाणी मी नव्हतो, हे आदित्य ठाकरे यांनी सांगायला पाहिजे हेाते. आदित्य ठाकरे आज संभाजीनगरात आले नसते, तर त्यांच्या पक्षातील लोकांना लाठी खायला लागली नसती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भांडुपचे देवानंद म्हणत संजय राऊतांवर टीका

ते दुसरे भांडुपचे देवानंद. ते उघडपणे महिला डॉक्टरला शिव्या देतात. त्याबद्दल काही बोललं जात नाही. त्या महिलेला त्रास दिला जातोय. संजय राऊत यांनी त्या महिलेबाबतसुद्धा बोलावं. संजय राठोड यांच्याबद्दल बोलताना तुमच्या प्रकरणात उद्धव ठाकरे का बोलत नाहीत. फक्त फडणवीस यांच्यावर आरोप करायचे. फडणवीस यांचा काम चांगलं आहे. गृह मंत्रालय कसे काम करतंय, हे पाहावं.

तुमच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात तुमचे गृहमंत्री जेलमध्ये गेले. मी आज सकाळीही मुंबईच्या पोलिस आयुक्तांना सांगितली की, दिशा सालियन प्रकरणात मी माहिती देतो. तुम्ही फक्त या प्रकारणाचा तपास अधिकारी बदला, अशी मागणी आम्ही केली आहे.

संजय राऊत यांच्याबाबत नीतेश राणे म्हणाले, तुमच्या मालकाच्या मुलाला आज हॉटेलमध्ये लपण्याची वेळ आली आणि दोन डायपर बदलायची वेळ आली. त्यांनी बाहेर यावे आणि सगळं सांगावं. गुंडांबद्दल बोलणारे हे लोक त्यांच्या मालकाच्या घरात गुंड आहेत, भांडी घासायला. पगारी नोकर कोण आहे. हे लोक मराठा आंदोलक म्हणून कोणाला पुढे आणतायत, ते कोण आहेत, असा सवालही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT