Uddhav Thackeray, Eknath Shinde News Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : …म्हणून आमचा निर्णय योग्य ठरला; एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

Uddhav Thackeray News : देशातील १५ विरोधी पक्षांची पाटण्यामध्ये बैठक झाली.

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray, Eknath Shinde News : देशातील १५ विरोधी पक्षांची पाटण्यामध्ये बैठक झाली. भाजपाच्या विरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकारातून हे सर्व पक्ष एकत्र आले आहेत. महाराष्ट्र भाजपाचे नेते आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने या बैठकीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. या बैठकीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली.

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, ज्यांनी राम मंदिराला विरोध केला. कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध केला. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना विरोध केला. तुम्ही (उद्धव ठाकरे) शनिवारी त्यांच्याबरोबर जाऊन बसला. त्यांच्याबरोबर दिलो का गठबंधन केले. म्हणूनच एक वर्षापूर्वी आम्ही जो निर्णय घेतला, तो कसा योग्य होता याची खातरजमा पाटण्याच्या बैठकीनंतर झाली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उद्धवजी नियमीत भाजपावर (BJP) आरोप करायचे. मेहबुबा मुफ्तींबरोबर सरकार स्थापन केले असे म्हणायचे. मग तुम्ही काय केले. तुम्ही मुफ्तींबरोबर बसलात, काल तुम्ही चारा घोटाळ्यातले आरोपी लालू प्रसाद यादव यांच्याबरोबरही बसले. आता मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराविरोधात हे लोक आंदोलन करणार. मात्र, कुठल्या तोंडाने तुम्ही हे आंदोलन करणार आहात. या भ्रष्टाचाऱ्यांबरोबर तुमचे साटेलोटे पाहायला मिळाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात हे १५ पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, या सर्वांनी आपला आत्मविश्वास गमावला. सर्वांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसत होते. विरोधी पक्षांनी मोदीजींच्या विरोधात एकत्र येणे हा मोदीजींचा विजय आहे. अशा कितीही आघाड्या केल्या आणि कितीही विरोधक एकत्र आले, आरोप केले, तरी जनतेने यांच्यातल्या एकालाही ४० पेक्षा जास्त खासदार दिले नाही. विरोधी पक्षनेता बनवण्याइतके खासदारही यांच्याकडे नाही, असा हल्लाबोल शिंदे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT