Russia News : रशियात धुमश्चक्री; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी पुतिन यांच्यावर साधला निशाणा; म्हणाले...

volodymyr zelenskyy News : पुतिन यांनी तयार केलेला वॅग्नर हा सशस्त्र सैनिकांचा ग्रुप आता त्यांच्याच विरोधात उभा ठाकला आहे.
Volodymyr Zelenskyy, Vladimir Putin
Volodymyr Zelenskyy, Vladimir PutinSarkarnama

Ukrainian President Zelensky News : रशियामध्ये अंतर्गत कलह सुरु आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या जवळचे असलेले झिबिग्नी प्रिगोझिव्ह यांनी बंड केले आहे. आपल्या विरोधकांचा सामना करण्यासाठी पुतिन यांनी तयार केलेला वॅग्नर हा सशस्त्र सैनिकांचा ग्रुप आता त्यांच्याच विरोधात उभा ठाकला आहे. वॅग्नरने रशियात बंड केले आहे. तसेच रशियात नवीन राष्ट्राध्यक्षांची नियुक्ती करण्याची घोषणा प्रिगोझिव्ह यानी केली आहे.

पुतिन एकीकडे अडतणीत असताना आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी रशियातील परिस्थितीवर ट्वीट करत पुतिन यांना लक्ष केले आहे. झेलेन्स्की आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, रशियाचा हा कमकुवतपणा आहे, हे तर अगदी साहजिक होत. हा सरळ सरळ कमकुवतपणाच आहे. रशिया आता जितका अधिक काळ युक्रेनमध्ये त्यांचे सैन्य व हे भाडोत्री सैनिक ठेवेल, तेवढा जास्त गोंधळ, दु:ख, अडचणींचा सामना रशियालाच (Russia) करावा लागेल.

Volodymyr Zelenskyy, Vladimir Putin
Congress News : भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेसची तयारी; पहिल्यांदाच 400 पेक्षा कमी जागा लढणार?

हे साहजिकच आहे. रशियाच्या दुष्ट गोंधळाच्या धोरणांपासून युरोपचे संरक्षण करण्यासाठी युक्रेन समर्थ आहे, असे झेलेन्स्कींनी म्हटले आहे. ज्यांनी दुष्ट वृत्तीचा मार्ग स्वीकारला, त्याने शेवटी स्वत:चाच विनाश ओढवून घेतला. इतर देशात सैन्य पाठवणारे व समोर संकट उभे राहिल्यानंतर त्यापासून पळ काढणाऱ्या सैन्याला रोखू न शकणाऱ्यांचे हेच होते.

जो इतरांना क्षेपणास्त्रांनी घाबरवण्याचा प्रयत्न करतो ते आम्ही पाडल्यानंतर स्वत:वरच ड्रोन हल्ल्याचा कांगावा करतो. त्याचे हेच होणार. जो लाखो नागरिकांना युद्धामध्ये ढकलतो व शेवटी स्वत:च त्याच्याच सैन्यापासून बचावासाठी मॉस्कोमध्ये स्वत:ला कोंडून घेतो. त्याचे हेच होणार, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. तसेच आता एवढी अनागोंदी माजली आहे की कुठलेही खोटे ते लपवू शकत नाही, असा हल्लाबोल झेलेन्स्की यांनी केला आहे.

Volodymyr Zelenskyy, Vladimir Putin
Russia News : रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या विरोधात वॅग्नर गटाचे बंड : सत्तेवरून हटवण्याची वेळ आली म्हणत...

दरम्यान, पुतिन यांनी तयार केलेल्या वॅग्नर या ग्रुपने आत्तापर्यंत पुतिन यांना सर्व प्रकारच्या कारवायांमध्ये साथ दिली आहे. अगदी अलिकडेच रशियाने सुरू केलेल्या युक्रेन युद्धातही वॅग्नर ग्रुप रशियन सैन्याच्या बरोबरीने कारवाया करत होता. परंतु याच काळात दोन्ही सैन्यामध्ये खटके उडाले. त्यामुळे आत्तापर्यंत युक्रेनवर आक्रमणासाठी आक्रमक होणाऱ्या रशियातच त्यांच्या दोन्ही सैन्यतुकड्या एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com