Congress News : भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेसची तयारी; पहिल्यांदाच 400 पेक्षा कमी जागा लढणार?

Rahul Gandhi News : बिहारमधील पाटण्यात विरोधी पक्षांची मोठी बैठक शुक्रवारी झाली.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi NewsSarkarnama
Published on
Updated on

Opposition Meeting : बिहारमधील पाटण्यात विरोधी पक्षांची मोठी बैठक शुक्रवारी झाली. ही बैठक यशस्वी करुन भाजप विरोधात लढायचे असेल तर काँग्रेसला मोठी तडजोड करावी लागले. अनेक मोठ्या राज्यांमध्ये प्रादेशीक पक्षांचा प्रभाव जास्त आहे. आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांना एकत्र करुन लढायचे असले तर काँग्रेसला जागांमध्ये मोठी तडजोड करावी लागणार हे स्पष्ट आहे. असे असले तरी अनेक राज्यांमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना आहे.

पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीत लोकसभेच्या 450 जागांवर एक उमेदवार देण्याबाबत चर्चा झाली. जर तोच निर्णय झाला तर काँग्रेसला मोठा धक्का बसेल. कारण काँग्रेसने आजपर्यंत एकदाही 400 पेक्षा कमी जागांवर निवडणूक लढवलेली नाही. काँग्रेसने जर एकास-एक उमेदवार ही बाब मान्य केली तर काँग्रेसला 400 जागा मिळणार नाहीत हे स्पष्ट आहे.

Rahul Gandhi News
Uddhav Thackeray : मेहबूबा मुफ्ती यांच्याशेजारी बसण्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले कारण..

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने (Congress) लढवलेल्या 421 जांगापैकी 209 जागांवर काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. 2004 मध्ये लोकसभेच्या 400 जगा लढली. त्यामध्ये 145 जागांवर त्यांना विजय मिळाला होता. 2009 मध्ये काँग्रेसने 440 जागा लढवल्या, 2014 ला काँग्रेसने 464 जागांवर निवडणुक लढवली. मात्र, त्यांना मोदी लाटेत फक्त 44 जागा मिळाल्या. 2019 मध्ये 421 जागा लढवल्या मात्र, 52 जागांवरच विजय मिळाला.

मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, आसाम, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, गोवा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, या राज्यांमध्ये भाजप (BJP) विरुद्द काँग्रेस असा थेट सामना आहे. त्याच बरोबर पंजाब, महाराष्ट्र, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळमधील काही जागांवर काँग्रेस आणि भाजप अशी सरळ लढत आहे. मात्र, एकास-एक उमेदवार हा प्रस्ताव मान्य झाला तर काँग्रेसला मोठा फटका बसले. काँग्रेसच्या वाट्याला 240 पर्यंतच जागाच येतील. त्यांना आपल्या जपवळपास 150 जागांवर पाणी सोडावे लागले. तिथे इतर पक्षांना पाठिंबा द्यावा लागले. त्यामुळे काँग्रेस इतक्या जागा सोडेल का हा मोठा प्रश्न आहे.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

आज येथे सर्व विरोधी पक्ष एकत्र आहेत. एकत्र येऊन आम्ही भाजपाला हरवणार. कर्नाटकमध्ये भाजपावाल्यांनी मोठी भाषणे केली होती, ते कर्नाटकच्या प्रत्येक कोपऱ्यात गेले, मात्र, त्यातून काय साध्य झाले ते तुम्ही सर्वांनी पाहिले आहे. कर्नाटकचा निकाल आपण पाहिला आहे. भाजपावाले म्हणत होते की त्यांचा मोठा विजय होईल. मात्र, काँग्रेस उभी राहिली आणि विजयी झाली.

Rahul Gandhi News
Prakash Ambedkar News : ठाकरेंना त्रास द्यायचाय का? प्रकाश आंबेडकर, दीपक केसरकारांना काय म्हणाले?

बैठकीनंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढील बैठकीत ही चर्चा सखोलपणे करू. विरोधकांची एकजूट ही एक प्रक्रिया आहे, ती पुढे जाईल. ही विचारधारेची लढाई आहे, काही मतभेद असतील. मात्र, आम्ही एकत्र आहोत. हा विचारधारेचा लढा असून आम्ही एकत्र उभे राहणार. आम्ही एकत्र काम करू, आमच्या समान विचारधारेचे रक्षण करू. विरोधी ऐक्याची ही प्रक्रिया आहे, ती पुढे जाईल. असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले होते. तसेच देशासाठी बलिदान करण्यास काँग्रेस तयार आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com