Mumbai, 10 February : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर बोलताना आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीबाबत मोठा खुलासा केला आहे. मुंबई विमानतळावर १४ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या व्हीएसआर कंपनीच्या लिएरजेट विमानाच्या अपघाताचा आजपर्यंत रिपोर्ट आलेला नाही, तो रिपोर्ट आला असता, तो सरकारपर्यंत पोचला असता तर मग काही गोष्टींमध्ये बदल होऊ शकले असते आणि मग आपले अजितदादा, माझे काका आज आपल्या सर्वांमध्ये असू शकले असते, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या (Ajit Pawar) विमान अघाताबाबत व्हीएसआर कंपनीबाबत अनेक खुलासे केले आहेत. ते करताना त्यांनी मुंबईतील २०२३ मधील लिएरजेट विमान अपघाताच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित केले आहे. ते म्हणाले, व्हीएसआर कंपनीचा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. मुंबई विमानतळावर १४ सप्टेंबर २०२३ रोजी एक अपघात झाला होता. ते विमान लिएरजेट 45xr होतं. विमान पडून घसरत गेलं. पाऊस पडत होता. विमान घसरत गेलं.
अजितदादांच्या अपघातानंतर काही लोक बारामती विमानतळाबाबत बोलायला लागले. या विमानतळावर आयएसएल यंत्रणा नाही, असं सांगितलं गेलं. ते बरोबर आहे. पण त्याच विमानतळावर आयएसएल यंत्रणा नसताना अनेक बडे लोक येऊन गेले आहेत. पण, मुंबई विमानतळावर आयएसएलसह अनेक अत्याधुनिक यंत्रणा असूनही अपघात कसा झाला, असा सवाल रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार म्हणाले, बारामती विमानतळावर आयएसएल यंत्रणा नाही, एवढ्यावर अपघाताचं कारण ढकलून चालणार नाही. मुंबई विमानतळावरील अपघात मुसळधार पाऊस आणि व्हीजिब्लिटीवर ढकलून मोकळे झाले. पाऊस असतानाही इतर विमानं लॅंड होऊ शकत होती. मग व्हीएसआर कंपनीचं लिएरजेट विमान का लॅंड होऊ शकलं नाही. ते का घसरत गेलं, याचा अभ्यास करावा लागणार आहे.
तो २०२३ चा विषय आहे. आतापर्यंत त्या अपघाताचा रिपोर्ट आलेला असेल, तो संबंधित लोकांना दिला असेल. पण दुर्दैव असं की २०२३ मधील व्हीएसआर कंपनीच्या लिएरजेट या विमान अपघताचा रिपोर्ट अजूनही आलेला नाही. अजितदादांच्या अपघतानंतर देशभरात ज्या बातम्या आल्या. त्यानंतर डीजीसीएला जाग आली आणि त्या अपघाताचा रिपोर्ट लवकरच येईल, असे सांगण्यात आले, असे आमदार पवार यांनी नमूद केले.
ते म्हणाले, डीजीसीएवर व्हीएसआर कंपनीचा व्होल्ड आहे, असं आमच्या सर्वांचं मत आहे, त्यामुळेच एवढा मोठा अपघात होऊनही तो दाबण्यात आला. तो रिपोर्ट का दाबण्यात आला. सप्टेंबर २०२३ मधील अपघाताचा रिपोर्ट आला असता, तो सरकारपर्यंत पोचला असता तर काही गोष्टींमध्ये बदल होऊ शकले असते आणि मग आपले अजितदादा, माझे काका आज आपल्या सर्वांमध्ये असू शकले असते. पण, मुंबई विमानतळावरील २०२३ मधील अपघाताचा ना रिपोर्ट झाला ना त्याची तपासणी झाली. तो अपघात कसा घडला, याचा कुठंही अभ्यास झालेला नाही. मुंबई विमानतळावरील रिपोर्ट दाबला, असा आमचा आरोप आहे.
अजितदादा यांच्या विमान अपघातात आपल्याला नुसतं चौकशी अहवालावर विसंबून राहून चालणार नाही, तर सगळे सीसीटीव्ही तपासवे लागतील, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.