Ajit Pawar Accident: 'अजितदादा एकटेच नव्हे तर, त्यांच्यासोबत विमानातून 'हा' बडा नेताही बारामतीला जाणार होता,पण...'; धक्कादायक माहिती समोर

Baramati Airplane Crash: अजित पवारांच्या अपघातानंतर चारच दिवसांत सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा देण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.
Ajit Pawar Death News in Marathi
Ajit Pawar Death News in MarathiSarkarnama
Published on
Updated on

Baramati News: उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्र राज्याला मोठा धक्का बसला. या अपघातावर अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू असून यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या दिवशी विमान अपघाताची दुर्घटना घडली,त्यादिवशी अजित पवारांसोबत माजी मंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील आणखी एक बडा नेता बारामतीला जाणार होता. याबाबत स्वत:नेत्यानेच माहिती दिली आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल रोज नवेनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहे. तसेच अजितदादांसोबतचा अपघाताआधी सहा मिनिटं श्रीजित पवार यांचा कॉल झाल्याचं समोर आलं होतं.यापूर्वी तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याशीही त्यांचा फोन झाल्याची माहिती समोर आली होती. पण यानंतर आता आणखी एका राजकारणात खळबळ उडवणारा दावा करण्यात आला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि महायुती सरकारमधील माजी मंत्री महादेव जानकर हेही अजित पवार यांच्यासोबत मुंबईहून बारामतीसाठी जाणार होते. महत्त्वाची बाब म्हणजे दोघेही नेते एकाच विमानातून प्रवास करणार होते. मात्र, जानकरांना पोहोचण्यास उशीर झाल्यानं अजित पवार बारामतीकडे रवाना झाले. जानकरांनीच याबाबत खळबळजनक माहिती दिली आहे.

याबाबत जानकर म्हणाले,बारामतीत ज्यादिवशी अजितदादांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, त्याचदिवशी मीही त्यांच्यासोबत त्याच विमानातून जाणार होतो. अजितदादांनी मला बारामतीमध्ये येण्यासाठी निमंत्रण दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचमुळे आम्ही दोघंही एकाच विमानातून बारामतीला जाणार होतो.

Ajit Pawar Death News in Marathi
Pankaja Munde: अजितदादांची पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्राताईंना खूप कष्ट करावे लागतील, मी हे अनुभवलंय! मुंडे साहेब गेल्यानंतर...

मात्र, मला पोहोचायला उशीर झाल्यामुळे अजित पवारांचे विमान ठरलेल्या वेळेत निघून गेले. मला पोहोचण्यासाठी उशीरा झाल्यामुळे मी बारामतीला जाणं रद्द केले. मला विमानतळावर जाण्यास उशीर झाल्यानं माझा जीव वाचला असला तरीही राज्यानं एक मोठा नेता नक्कीच गमावल्याची भावनाही महादेव जानकर यांनी बोलून दाखवली.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाला बारामतीत मोठा अपघात झाला. या अपघातात बारामती विमानतळावर उतरताना ही घटना घडली. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यातील अनेक नेत्यांकडून शंका उपस्थित करण्यात आली आहे.

Ajit Pawar Death News in Marathi
PM Modi in Lok Sabha : लोकसभेत आज 21 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला; मनमोहन सिंग यांच्यानंतर मोदींवर आली ‘नकोशी’ वेळ…

अजित पवारांच्या अपघातानंतर चारच दिवसांत सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा देण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.पण या शपथविधीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दोन्ही बाजूने दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com