Sharad Pawar | Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

NCP News : अजित पवार की शरद पवार, कोणाचे आमदार होणार अपात्र? विधानसभा अध्यक्ष आज देणार निकाल

NCP MLA Disqualification Verdict : अजित पवार गट आणि शरद पवार गटानं एकमेकांविरोधात अपात्रता याचिका दाखल केली होती.

Akshay Sabale

NCP MLA Disqualification Case : काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांना दिलं होतं. त्यानंतर आज ( 15 फेब्रुवारी ) राष्ट्रवादी आमदार प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) देणार आहेत. राहुल नार्वेकर सायंकाळी आमदार अपात्रता निकालाचं वाचन करतील. या निकालाकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटासह राज्याचं लक्ष लागलं आहे. (NCP MLA Disqualification Latest News)

अजित पवारांसह काही आमदारांनी 2 जुलै 2023 मध्ये शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट समोरासमोर आले. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात अपात्रतेच्या याचिका दाखल केल्या होत्या. शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी अपात्रताप्रकरणाची सुनावणी अध्यक्षांसमोर सुरू होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदारांची साक्ष, उलटतपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर ३१ जानेवारीला अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचं कामकाज संपले. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आज निकाल देणार आहेत. त्यामुळे कुणाचा व्हिप लागू होतो? कोण अपात्र होते, हे अध्यक्षांच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

अजित पवारांबरोबर किती आमदार?

  • महाराष्ट्र - 41 आमदार

  • नागालँड - 7 आमदार

  • झारखंड - 1 आमदार

  • लोकसभा - 2 खासदार

  • महाराष्ट्र विधानपरिषद - 5 आमदार

  • राज्यसभा - 1

शरद पवारांबरोबर किती आमदार?

  • महाराष्ट्र - 15 आमदार

  • केरळ - 1 आमदार

  • लोकसभा - 4 खासदार

  • महाराष्ट्र विधानपरिषद - 4 आमदार

  • राज्यसभा - 3 खासदार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT