Sanjay Raut 1 Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांना ट्विट करता येतं का? संजय राऊतांचा 'ट्रेनिंग'चा सल्ला

Pradeep Pendhare

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे ट्विटवर खासदार संजय राऊत यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला.

'मुख्यमंत्री यांना स्वतःला ट्विट करता येत का?', असा प्रतिप्रश्न करत खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या समाज माध्यमं हाताळण्याच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "मुख्यमंत्री यांना स्वतःला ट्विट करता येत का? मुख्यमंत्री यांना ट्विट करता येत नाही. आम्ही ओळखतो त्यांना. ट्विट करण्यासाठी माणसं ठेवली आहेत, पण त्यांना ट्रेनिंग द्या नीट". कटोरे घेऊन दिल्लीच्या दरबारात, गुजरातच्या व्यापारी दरबारात गेल्या अडीच वर्षांपासून कोण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. उद्धवसाहेबांचं आम्ही पाहून घेऊ, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गुजरात धार्जिण्यपणावर संजय राऊत यांनी थेट हल्ला चढवला. "अडीच वर्षांपासून गुजरातच्या दरबारात मोदी आणि शाह यांची भांडी कोण घासायला गेलं होतं? मुख्यमंत्रीपदासाठी हेच धुणी-भांडी करण्यासाठी गेले होते. आता देखील दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या उंबरठ्यावर पाय पुसणार, जेव्हा दोघांचा हात जाईल, तेव्हा महाराष्ट्रात यांची किंमत कचऱ्याएवढी देखील राहणार नाही", असाही संजय राऊत यांनी टोला लगावला.

एकनाथ शिंदेंनी पूर्व आयुष्य तपासावं

'एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदा ठाकरे घराणं आहे, हे ओळखावं. या ठाकरे घराणंमुळं या पदावर पोचला आहात, हे लक्षात घ्या, मिस्टर शिंदे! आणि ठाकरेंवर बोलताना आपलं पूर्व आयुष्य काय होतं, हे विसरू नका. आपण गुलाम आहात, गुजरातच्या व्यापारी मंडळाचे', असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT