Mumbai News : मुंबईत मलबार हिल येथील लोकभवन येथ एक धक्कादायक घटना घडली आहे. लोकभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) एका जवानाने स्वतःवर गोळी झाडली आहे. या घटनेत या जवानाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या जवानाने त्याच्या सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून आपलं जीवन संपवलं आहे. मृत जवानाची ओळख कौस्तुभ सांगळे अशी झाली असून ते एसआरपीएफ ग्रुप 16 मधील पोलीस अंमलदार होते. सध्या त्यांची नियुक्ती मुंबईतील लोकभवनाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी करण्यात आली होती.
सांगळे हे 'लोक भवन' परिसरात गार्ड ड्युटी बजावत असताना अचानक गोळीबाराचा आवाज झाला. आवाज ऐकून इतर सुरक्षा कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच मलबार हिल पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथक लोकभवनात दाखल झाले. पंचनामा आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस विविध अंगांनी तपास करत असून तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. शिवाय कौस्तुभ सांगळे यांनी नेमकी का आत्महत्या केली याबाबतचा पुढील तपास मलबार हिल पोलीस करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.