Eknath Shinde, Ajit Pawar, Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

Thackeray vs Shinde : मुख्यमंत्री शिंदे, अजितदादा, श्रीकांत शिंदेंचे गुन्हेगारांबरोबरचे फोटो व्हायरल; ठाकरे गटाची जहरी टीका

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली.

Ganesh Thombare

Mumbai News: भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री शिवसेनेचे (शिंदे गट) शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केला. त्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली. या गोळीबाराच्या प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होत त्यांना अटक झाली. मात्र, या प्रकारानंतर विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत आहेत. (Thackeray Group vs Shinde Group)

आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. तसेच ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर कुख्यात गुंड दीपक सपकेचा फोटो 'सामना'च्या पहिल्या पानावर छापण्यात आला आहे. तसेच गुंड दीपक सपकेचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, असे देखील म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

श्रीकांत शिंदेंचाही फोटो

कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्रीकांत शिंदे आणि हेमंत दाभेकर यांच्या भेटीचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट करत जोरदार टीका केली होती. यानंतर आज हे फोटो 'सामना'तून छापत जोरदार टीका करण्यात आली आहे.

अजित पवारांचाही फोटो

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या असिफ दाढीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचे फोटो व्हायरल झाले होते. यानंतर आता 'सिमी'शी कनेक्शन असलेला गुन्हेगार असिफ दाढी याने उपमुख्यमंत्री अजित पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचा फोटो आता 'सामना'त पहिल्या पानावर छापत जहरी टीका करण्यात आली आहे.

दरम्यान, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराच्या प्रकारानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच गंभीर आरोप करत जोरदार टीका केली होती. तसेच राज्यात ते गुडांराज आणू इश्चित आहेत, असंही गायकवाड यांनी म्हटलं होतं. यानंतर आता 'मिंद्याचं जंगलराज गुंड, दरोडेखोरांनी ढापलं' अशा आशयाची बातमी छापण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, यावर आता शिवसेना शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते, हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT