Sudhir Mungantiwar, Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Chhagan Bhujbal & BJP : छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर? मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं...

Sudhir Mungantiwar : राज्यात पराभवाचं महत्वाचं कारण म्हणजे विरोधी पक्षाने केलेला खोटा प्रचार हे आहे. जाती-जातींमध्ये विष पेरण्याच काम विरोधी पक्षाने केले.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ खासदारकीसाठी लोकसभेनंतर राज्यसभेसाठीही इच्छुक होते. मात्र त्यांना महायुतीसह पक्षातही डावलण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यातून नाराज भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा होऊ लागली आहे. मात्र ही चर्चा काल्पनिक असल्याचे सांगून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भुजबळ भाजपमध्ये येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली येथे मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभेतील पराभव, फडणवीसांचा राजीनामा आणि भुजबळांच्या भाजप प्रवेशावर छेडण्यात आले. मुनगंटीवार म्हणाले, भुजबळ आमच्या पक्षात येण्याच्या चर्चा कपोकल्पित आहेत. एका वयानंतर ते भाजपमधे येतील असे अजिबात वाटत नाही. त्यामुळे अशा चर्चांना महत्त्व नसते, असे म्हणत मुनगंटीवार यांनी भुजबळांचा भाजप प्रवेशाच्या चर्चा खोट्या असल्याचा दावा केला.

राज्यात पराभवाचं महत्वाचं कारण म्हणजे विरोधी पक्षाने केलेला खोटा प्रचार हे आहे. जाती-जातींमध्ये विष पेरण्याच काम विरोधी पक्षाने केले. कांदा, सोयाबीन या सगळ्याचा खोटा प्रचार काँग्रेसने केला, असा आरोप मुनगंटीवार यांनी करत पराभवाचे खापर महाविकास आघाडीवर फोडले.

पराभवाचं विश्लेषण एका क्षणात होणार नाही. पराभवाच्या कारणांवर एखादा कार्यकर्ता भावनेच्या भरात येऊन करतो, त्यावर विश्वास ठेवणे योग्य नाही. लोकसभेच्या निवडणुकीच विश्लेषण आज होईल. विकासाची भूमिका पुढे घेऊन जाण्याबाबत चर्चा होईल. तसेच विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत देखील चर्चा होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अत्यंत खराब कामगिरी केल्याची सर्व जाबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे ठरवले आहे. त्यांना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आहे त्या स्थितीत पक्षाचे काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे. असे असले तरी फडणवीस आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे बोलेले जाते. यावर मुनगंटीवार म्हणाले, फडणवीस यांच्या राजीनाम्यावर अशी सामूहिक चर्चा होईल अस वाटत नाही. त्यांची वैयक्तिक चर्चा होईल.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT